

Bombs Thrown Outside Patna Theatre Screening Gadar 2: सनी देओलचा बहुप्रतीक्षित गदर 2 सिनेमा प्रदर्शित होऊन सात दिवस झाले असून सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
चित्रपटात सनी पाजीचा दरारा आणि हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणुन गेले आहे. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहेत तर दुसरीकडे पटना येथे हा सिनेमा सुरु असतांना एक धक्कादायक घटना घडली आहे.
पाटन्यातून एक घटना समोर आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काहींनी चित्रपटगृहांच्या बाहेर बॉम्ब फेकले आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील धमकावलं.
त्यात दोन संशयितांनी थिएटरच्या बारवर कमी-तीव्रतेचे बॉंम्ब फेकले, त्यापैकी एकाचा स्फोट झाला. संशयितांना अटक करण्यात आली आहे.
या सिनेमा हॉलचा मालक सुमन सिन्हा यांनी या बातमीला दुजोरा दिला असून सांगितले की, संशयितांना गदर 2 ची तिकिटे ब्लॅकमध्ये विकायची होती, मात्र कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्यांना असे करु दिले नाही तेव्हा हल्लेखोरांनी हा स्फोट करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. वेळीच कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले नाहीतर खुपच गंभीर घटना घडली असती असं त्यांनी सांगितलंं.
हा स्फोट थिएटरपासून खूप दूर झाला आणि त्यांनी सिनेमाच्या कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यांना वेळीच पोलिसांनी पकडले आणि नंतर कारवाई केली.
गदर सिनेमाची क्रेझ खुपच मोठ्या प्रमाणात आहे. तसचं प्रेम आता गदर 2 ला देखील मिळत आहे. गदर 2 चे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गदर 2च्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर गदरने प्रदर्शनाच्या 7 व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 22 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 283.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.