Box office:अमिताभच्या 'ऊंचाईनं' ऋषभ शेट्टीच्या कांताराला फोडला घाम, पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड Amitabh bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Box office: Amitabh Bachchan 'Uunchai' movie day first collection, kantara hindi version opening less

Box office:अमिताभच्या 'ऊंचाई'ने ऋषभ शेट्टीच्या कांताराला फोडला घाम, पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड

Box office: अमिताभ बच्चन,बोमन ईराणी,अनुपम खेर आणि डॅनी अभिनित 'ऊंचाई' सिनेमा शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. सिनेमाविषयी लोकांच्या मनात फारसा उत्साह पहायला मिळाला नव्हता. पण समिक्षकांनी आणि सिनेमा पाहून येणाऱ्या प्रेक्षकांनी सिनेमाचं कौतूक केल्यानंतर चित्र पालटताना दिसलं अन् उत्स्फुर्त प्रतिसादही पहायला मिळत आहे.

दुपारच्या शो ला 'ऊंचाई' सिनेमासाठी प्रेक्षकांची संख्या मोठी दिसतेय. आणि बॉक्सऑफिसवरील पहिल्या दिवशीचा कमाईचा आकडा पाहता 'ऊंचाई'ची दमदार सुरुवात झाल्याचं देखील कळत आहे. (Box office: Amitabh Bachchan 'Uunchai' movie day first collection, kantara hindi version opening less)

हेही वाचा: Exclusive:'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच..','हर हर महादेव'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

'ऊंचाई' सिनेमाला सूरज बडजात्यानं दिग्दर्शित केलं आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'प्रेम रतन धन पायों' सारखे सिनेमे सूरज बडजात्या यांनी आतापर्यंत दिग्दर्शित केले आहेत. 'ऊंचाई' तीन वयस्कर व्यक्तींच्या मैत्रीची कथा आहे,जे आपल्या एका निधन पावलेल्या मित्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट सर करण्याचा ध्यास घेतात. मेकर्सनी आपल्या अनेक हिट सिनेमांप्रमाणेच 'ऊंचाई' सिनेमालाही पहिल्या दिवशी मोजक्याच स्क्रीन्सवर रिलीज केलं,पण तरीदेखील सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळालं.

'Uunchai' Day first box office collection

'Uunchai' Day first box office collection

रिपोर्ट्स सांगत आहेत की, 'ऊंचाई' सिनेमानं पहिल्या दिवशी बॉक्सऑफिसवर १.८१ करोडचं कलेक्शन केलं आहे. शुक्रवारी सिनेमाला ५०० पेक्षाही कमी स्क्रीन्सवर रिलीज केलं गेलं. आणि पहिल्या दिवशी सिनेमाचे १५०० शो दाखवले गेले. पण या शो ना प्रेक्षकांची मोठी गर्दी पहायला मिळाली आणि सिनेमाला याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.

उंचाई सिनेमाचे मेकर्स असलेल्या राजश्री प्रॉडक्शननं याआधी 'हम आपके है कौन' आणि 'मैने प्यार किया' सिनेमांना देखील लिमिटेड स्क्रीन्सवर रिलीज केलं गेलं होतं. या सिनेमाला मिळालेलं अॅडव्हान्स बुकिंग पाहिलं तर कळत आहे की 'ऊंचाई' सिनेमाची कमाई नक्की वाढेल. पहिल्या आठवड्यात ७ ते ८ करोड सिनेमानं कमावले तर ही चांगली कमाई मानली जाईल.

हेही वाचा: Samantha- नागाचैतन्यचा घटस्फोटानंतर १ वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार,चर्चेला उधाण...

सिनेमाच्या लिमिटेड रिलीज विषयी बोलायचं झालं तहर 'ऊंचाई'नं पहिल्या दिवशी 'कांतारा'पेक्षा चांगली कमाई केली आहे. Rishabh Shetty च्या 'कांतारा'नं हिंदी व्हर्जनमध्ये १.२७ करोड पहिल्या दिवशी कमावले होते,या सिनेमाला १२०० ते १३०० शोज मिळाले होते. बॉक्सऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या कांतारानं हिंदी व्हर्जनमध्ये शुक्रवारी पहिल्या दिवशी १.२५ करोड रुपये कमावले. म्हणजे उंचाई सिनेमाची कमाई नक्कीच 'कांतारा'पेक्षा जास्त आहे.

'ऊंचाई'चं ओपनिंग कलेक्शन राजकुमार रावच्या 'बधाई दो' आणि आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' पेक्षाही चांगलं आहे. स्क्रीन्सच्या आधारावर कमाईचं गणित मांडलं तर २२०० हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' पेक्षा अधिक कमाई 'उंचाई'नं केली आहे. 'जयेशभाई जोरदार'नं इतक्या जास्त स्क्रीन्सवर रिलीज होऊनही फक्त ३.२५ करोडच कमावले होते.