'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवरही फडकावला झेंडा; पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल...

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धडक मारणार.. झालंही तसंच! काल (ता. 10) तानाजी रिलीज झाला. या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत करण्यात आलं. कुठे अजयच्या तानाजीच्या रूपातल्या पुतळ्याला हार घालण्यात आले तर कुठे फटाके फोडून तानाजीला सुरवात कण्यात आली. शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल...

नवा चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरिअर

चित्रपट जाणकारांच्या मते तानाजी पहिल्याच दिवशी 10 करोडची कमाई करेल. पण हे सगळे अंदाज धुडकावत तानाजीने पहिल्याच दिवशी 15 कोटींचा गल्ला जमावला आहे. पहिल्याच दिवश तानाजी लागलेले सर्व थिएटर हाऊसफुल्ल पाटीने झळकत होते. पहिल्याच दिवशी 15 कोटींची मजल मारलेल्या तानाजीची कमाई मोठ्या प्रमाणात होणार यात काही शंका नाही. ट्रेड अॅनालिस्ट राज बंन्सल यांनी ट्विट करत तानाजीच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा सांगितला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जाईल. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. व सगळे स्क्रीन्स विकएंडला हाऊसफुल्ल आहेत.  

Tanhaji Movie Review : तान्हाजीचे डायलॉग, ऍक्‍शन लय भारी!

तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. तसेच ओम राऊतने दिग्दर्शनाच्या बाबतीत सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तसेच काजोल-अजय यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर झळकली असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत. सैफ अली खानचा अभिनय प्रेक्षकांना आवडतोय. चित्रपट परिक्षक व प्रेक्षकांच्या दृष्टीने या चित्रपटाबाबत सकारात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: box office collection by Tanhaji is 15 crore on first day