महाभारतामध्ये भीमची भूमिका साकारलेला आहे एक मोठा सुपरस्टार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

साैरव गुर्जरची जबरदस्त फाईटिंग स्टाईल पाहून त्याला डब्ल्यू डब्ल्यू ई रॉमध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली होती. सध्या सौरभ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. येत्या काळात तो रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकणार आहे.

मुंबई : आजकाल लहान मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. अनेकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. त्याचपध्दतीने डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टारसुध्दा लहानमोठ्या मालिकांमध्ये काम करताना पाहावयास मिळत आहे. 'महाभारत' ही आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक कथा आहे. या कथेवर आजवर अनेक लहानमोठ्या मालिका तयार झाल्या आहेत. यापैकी एक मालिका २०१३ मध्ये स्टार प्लस वाहिनीने तयार केली होती. यामध्ये एका डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टारने महाभारतामध्ये भीमची ही व्यक्तिरेखा साकारली होती. हा अभिनेता भारतातील सर्वोत्कृष्ट किक बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. महाभारत मालिकेत झळकलेल्या या फायटरचं नाव सौरव गुर्जर असे आहे. 

सौरव एक डब्ल्यू डब्ल्यू ई फायटर आहे. उंची आणि भारदस्त शरीर पाहून भीम या व्यक्तिरेखेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. महाभारत ही त्याच्या करिअरमधील पहिली मालिका होती. यापूर्वी त्याने कधीही अभिनय केला नव्हता. त्यामुळे शोच्या निर्मात्यांनी ब्योमकेश बक्षी फेम रजित कपूर यांच्याकडे त्याला अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी पाठवले होते. सर्वप्रथम त्यांनी सौरवला हिंदी भाषा बोलायला शिकवली.

त्यानंतर सौरवला अभिनयाचे धडे दिले. सौरवने या वर्षी जानेवारी महिन्यात डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये पदार्पण केले. तो डब्ल्यू डब्ल्यू ई च्या एन एक्स टी सीरिजमध्ये स्पर्धा खेळतो. त्याची जबरदस्त फाईटिंग स्टाईल पाहून त्याला डब्ल्यू डब्ल्यू ई रॉमध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली होती. सध्या सौरभ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. येत्या काळात तो रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकणार आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला नाकारला पॅरोल; तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boxer Turned Actor Saurav Gurjar Sets Sights On WWE Ring