Boycott Bollywood: 'आता बस्स, खूप झालं! नाहीतर...' अर्जुन कपूरचा संताप |Boycott Bollywood Movies Arjun Kapoor Angry on trollers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Boycott Bollywood news

Boycott Bollywood: 'आता बस्स, खूप झालं! नाहीतर...' अर्जुन कपूरचा संताप

Boycott Bollywood : बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका अशी जोरदार मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामध्ये (Bollywood Arujun Kapoor) बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. यानंतर बॉलीवूडच्या चित्रपटांवरच बहिष्कार टाकण्याचे आवाहन नेटकऱ्यांकडून होत असताना आता त्यावर बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी (Boycott Laal Singh Chaddha) सावध झाले आहेत. त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून जी लोकं ट्रोलिंग आणि बहिष्काराची मागणी करत आहे त्यांना अद्दल घडवावी लागेल. अशी प्रतिक्रिया बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनं दिली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर नेटकरी काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अर्जुननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची नेटकऱ्यांची जी भूमिका आहे ती एक वाईट सवय होताना दिसत आहे. हा सगळा काय प्रकार आहे हे काही कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता जे काही होतं आहे ते अति आहे. नेटकऱ्यांनी वेळीच हा प्रकार थांबवावा. जे कुणी असा प्रकार करत आहेत त्यांना चांगलीच अद्दल घडवावी लागेल. असेही अर्जुननं यावेळी म्हटले आहे. 2012 मध्ये परिणीती चोप्रा सोबत इश्कजादे मधून अर्जुननं बॉलीवूडमध्ये इंट्री केली होती. त्याच्या वाट्याला फारसं यश आले नसले तरी चाहत्यांनी त्याची दखल ही बऱ्याचदा मलायकासोबतच्या रिलेशनशिपमुळे घेतल्याचे बोलले जाते.

नुकताच त्याचा एक व्हिलन रिटर्न्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया, दिशा पटानी, जॉन अब्राहम यांनी काम केले. यामध्ये अर्जुननं गौतम मेहराची भूमिका केली होती. अर्जुननं बॉलीवू़ड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं की, मला वाटतं आम्ही शांत बसतो म्हणजे आम्हाला राग येत नाही असे समजू नका. बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार हा काय प्रकार सुरु आहे हे कळायला मार्ग नाही. आमचा मोठेपणा आम्ही शांत बसतो नाहीतर आम्हाला नेटकऱ्यांना अद्दल घडवावी लागेल. अशी भूमिका अर्जुननं घेतली आहे. नेटकऱ्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

हेही वाचा: Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhan: 'आमीर - अक्षय' दोघंही गोत्यात!

आम्ही दरवेळी असा विचार केला की, लोकांना आमचे काम आवडले नाही म्हणून ते आम्हाला अव्हेरत असतील. किंवा त्यांना आमचे चित्रपट पाहावेसे वाटत नसतील. मात्र आता तसे कारण काही दिसत नाही. ते वेगळ्या पद्धतीनं विचार करत आहे. काही कलाकृती चांगल्या असूनही त्यांनी त्या पाहण्याच्या ऐवजी त्याच्यावर टीका केली आहे. म्हणून मला असे वाटते की, आम्ही खूप सहन केले आहे. नेटकरी अति करत आहेत. जे काही होतं आहे ते चुकीचे आहे असेही अर्जुननं सांगितले आहे.

हेही वाचा: Boycott Laal Singh Chaddha: ट्रोलर्सवर करिना भडकली, 'ही अशी लोकं जी...'

Web Title: Boycott Bollywood Movies Arjun Kapoor Angry On Trollers Now The Time To Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..