Suniel Shetty: "बॉलिवूडला बॉयकॉट करणं थांबवा", सुनिल शेट्टीची सीएम योगींना विनंती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suniel Shetty
Cm Yogi Adityanath

Suniel Shetty: "बॉलिवूडला बॉयकॉट करणं थांबवा", सुनिल शेट्टीची सीएम योगींना विनंती..

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची भेट त्यांनी घेतली. सिने जगतातील लोकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. खरं तर, उत्तर प्रदेशमध्ये एक फिल्म सिटी बनवली जात आहे, ज्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी चित्रपट कलाकारांशी चर्चा केली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच सुनील शेट्टी, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, सोनू निगम आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली.

हेही वाचा: Mumbai Film City: मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाणार? योगी आदित्यनाथ स्पष्टचं बोलले

दरम्यान, सुनील शेट्टी यांनी योगी आदित्यनाथ यांना बॉलीवूडवरील बहिष्काराचा ट्रेंड संपवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुनील शेट्टी म्हणाले की, बॉलीवूडची डागाळलेली प्रतिमा सुधारता यावी यासाठी बॉयकॉटचा टॅग काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड तुमच्या सांगण्यावरुन बंदही होऊ शकतो. बॉलिवूड कलाकारांनी याआधी चांगले कामही केले आहेत असंही ते म्हणाले.

हेही वाचा: Bigg Boss 16 Contestants Net Worth: बिग बॉस 16 च्या स्पर्धकांकडे किती कोटींची संपत्ती माहितीये का?

काही काळापासून बॉलिवूडबाबत सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवण्याचं काम करण्यात येत आहे. गेल्या २-३ वर्षात या ट्रेंडमुळे अनेक हिंदी चित्रपटांना यांचा फटका बसला आहे.

हेही वाचा: Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली

2022 मध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' ते अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन', 'दोबारा' आणि 'लिगर' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. लोकांमध्ये बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटांबद्दल इतका राग आहे की आता चित्रपटाचे नाव ऐकताच लोक त्याविरोधात बॉयकॉट ट्रेंड करु लागले आहेत.