esakal | दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...

दोन वर्षांनीनंतरही सुपरस्टार श्रीदेवीच्या चाहत्यांच्या मनात मृत्यूचं गुढ कायम...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - बॉलीवुडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची आज दूसरी पुण्यतिथी. 2018 मध्ये आजच्याच दिवशी श्रीदेवी दुबई मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृत पावली होती. श्रीदेवीच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
श्रीदेवीने तिच्या फिल्मी करियरमध्ये मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, चालबाज, मॉम, इंग्लिश विंग्लिश सारखे सुपरहिट सिनेमे दिले. श्रीदेवीच्या अचानक जाण्याने तिचे पति बोनी कपूर पूर्णतः तुटले होते. या दुःखातुन सावरणं त्यांच्यासाठी कठिण होतं. आजही श्रीदेवीच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावतात. एका कार्यक्रमात बोनी कपूर यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. ते म्हणतात की मी माझ्या प्रेमाची कबूली श्रीला देण्यासाठी 12 वर्ष लावली होती.

मोठी बातमी - म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत..

बोनी त्यांच्या आणि श्रीच्या लव्हस्टोरी बद्दल सांगतात की, 'मला श्रीच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी 12 वर्ष लागली. मी जेव्हा तिला पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. हे नेहमीच एकतर्फ़ी प्रेम होतं. मी तिला फॉलो करता करता चेन्नई पर्यंत पोहोचलो होतो. तिला घेऊन मला सिनेमा साइन करायचा होता पण ती तेव्हा तिथे उपस्थित नव्हती. मी तिचा आणि तिच्या कामाचा खुप मोठा फॅन होतो. एक अभिनेत्री म्हणून तिची जी प्रतिमा होती त्याची मी नेहमीच स्तुती करायचो' असे ते सांगतात.

जेव्हा बोनी श्रीला भेटायला चेन्नईला गेले होते तेव्हा श्रीदेवी सिंगापूरला शुटिंग मध्ये बिझी होती. म्हणून ते नाराज होउन मुंबईला परत आले होते. बोनी कपूर 1984 मध्ये जेव्हा मिस्टर इंडिया सिनेमाची ऑफर घेऊन श्रीदेवीच्या आईकडे गेले होते तेव्हा तिच्या आईने 10 लाख फी सांगितली होती. पण बोनी यांनी श्रीला 11 लाख देऊ केले. हे करण्यामागच एकच कारण बोनी यांच्या जवळ होतं ते म्हणजे त्यांना श्री सोबत जवळीक वाढवायची होती.

मोठी बातमी - "डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

बोनी यांनी श्रीदेवीला 1993 मध्ये प्रपोज केलं. मिस्टर इंडियाच्या सेटवर बोनी स्वतः श्रीला काही कमी पडू नये यासाठी जातीने लक्ष घालत होते. इतकेच नाही तर तिच्यासाठी वेगळी मेकअप रूम देखील त्यांनी बनवली होती. यानंतर श्रीदेवीचा त्यांच्यावर हळूहळू विश्वास बसत होता. बोनी श्रीदेवीच्या प्रेमात एवढे वेडे झाले होते की श्रीदेवी चांदनी सिनेमासाठी शूट करत असलेल्या ठिकाणी म्हणजेच थेट स्विझरलॅंडला जाऊन पोहोचले. स्विझरलॅंड वरुन परतल्यानंतर बोनी यांनी त्यांची पहिली पत्नी मोना हिला ते श्रीदेवीवर प्रेम करत असल्याचं सांगितलं. हे ऐकून मोना यांना जबरदस्त धक्का बसला. याचा खुलासा मोना यांनी एका मुलाखतीत केला होता.

त्या सांगतात, 'बोनी वयाने माझापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते जेव्हा माझं बोनी यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा मी 19 वर्षाची होती. मी त्यांच्यासोबतच मोठी झाले. आमच्या लग्नाला 13 वर्ष झाल्यानंतर मला कळले की माझे पती कोणा दुसरीवरंच प्रेम करतात. त्यानंतर मात्र आमच्या नात्यात काहीच उरलं नाही आणि आम्ही आमच्या नात्याला दूसरी संधी देखील देऊ शकत नव्हतो कारण तेव्हा श्रीदेवी गरोदर होती..'

मोठी बातमी - चीनहून परतली, अन् 'कोरोनो' घेऊन आली!'

श्रीदेवीच्या अशा या अचानक एक्झिटमुळे तिच्या कुटुंबासोबतच संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. आज श्रोदेवीला जाऊन 2 वर्ष झाली असली तरी तिच्या या मृत्यूचं गुढ तिच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे.

second death anniversary of sridevi fans still in trauma and figuring reason of her death 

loading image