गदिमांचा 'ळ'चा विक्रम तब्बल 57 वर्षांनी मोडित

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जुलै 2017

पोरानुं.. टाल्या वाजवा!! 
सत्तावन्न वरसांपुर्वी 'घननीळा' या येकाच गान्यात त्येरा वेला 'ळ' लिवनार्या आदुनिक वाल्मिकी गदिमांच्या पवीर्त स्म्रुतीस अभीवादन करुन वीनम्रपने सादर करीत होत.. चौदा वेला 'ळू' असल्यालं  रेकार्ड ब्रेकिंग काव्य.. 'लग्नाळू'!!

मुंबई : गदिमांनी तब्बल 57 वर्षांपूर्वी आपल्या एका गीतात ळ या अक्षराचा तब्बल 13 वेळा वापर केला होता. घननीळा हे ते गीत होते. आता इतक्या वर्षांनी हा विक्रम मागे पडला आहे. कारण विशाल देवरूखकर दिग्दर्शित लग्नाळू या गाण्यात 14 वेळा ळ वापरण्यात आला आहे. 

लग्नाळू हे गाणे नुकतेच लाॅंच करण्यात आले. त्यावेळी ही माहीती देण्यात आली. शिवाय आॅनलाईन विश्वात तसे मेसेजही फाॅरवर्ड करण्यात आले. यात गदिमांच्या पवित्र प्रतिभेस आणि स्लृतिस वंदन करून हा विक्रम मोडल्याची माहीती देण्यात आली. 

पोरानुं.. टाल्या वाजवा!! 
सत्तावन्न वरसांपुर्वी 'घननीळा' या येकाच गान्यात त्येरा वेला 'ळ' लिवनार्या आदुनिक वाल्मिकी गदिमांच्या पवीर्त स्म्रुतीस अभीवादन करुन वीनम्रपने सादर करीत होत.. चौदा वेला 'ळू' असल्यालं  रेकार्ड ब्रेकिंग काव्य.. 'लग्नाळू'!!

असा हा मेसेज करून या गाण्याची लिंक फाॅरवर्ड करण्यात आली. 

Web Title: Boys marathi movie new song Lagnalu esakal news