'तिचा मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न'; एक्स -वाईफ एंजेलिनावर ब्रॅडचा आरोप Hollywood Celebrity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brad Pitt says Angelina Jolie 'sought to inflict harm' with vineyard sale

'तिचा मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न'; एक्स- वाईफ एंजेलिनावर ब्रॅडचा आरोप

हॉलीवूड अभिनेता ब्रॅड पीट(Brad Pitt) यांन आपली पूर्वाश्रमीची पत्नी एंजेलीना जोली(Angelina Jolie) वर गंभीर आरोप केले आहेत. त्यानं म्हटलं आहे की एंजेलीनानं आपल्या वाट्याला आलेली प्रॉपर्टी विकून मला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार,एंजेलीनानं एका रशियन व्यावसायिकाला फ्रांसीसी विनियार्ड मधील आपला ५० टक्के हिस्सा विकला आहे. आणि हे करुन तिनं आपल्याला नुकसान पोहचवल्याचं ब्रॅडनं म्हटलं आहे. ब्रॅड पीटच्या टीमनं कोर्टात लीगल डॉक्युमेंट्स सादर केलेयत ज्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. पण आता सर्वांमध्ये चर्चा सुरू आहे की हे विनियार्ड प्रकरण नेमकं आहे काय? ज्यावरुन या दोघांमध्ये वाद सुरु झालाय. चला जाणून घेऊया सविस्तर(Brad Pitt says Angelina Jolie 'sought to inflict harm' )

हेही वाचा: 'हिंदू देवतांचा अपमान केला जातो तेव्हा...'; नुपूर शर्मा वादात कंगनाची उडी

ऑक्टोबर २०२१ मध्ये एंजेलिनानं विनियार्डमधील आपला ५० टक्के वाटा एका अनोळखी व्यक्तीला विकला होता. ब्रॅड सोबत तिचं लग्न २०१४ मध्ये झालं होतं. ब्रॅड पीटने फेब्रुवारी २०२२ मध्ये विनियार्ड संदर्भात केस दाखल करुन म्हटलं होतं की त्यानं एंजेलिनासोबत एक डील केलं होतं की ते दोघे एकमेकांना विचारल्याशिवाय विनियार्ड संदर्भातला कोणत्याही व्यवहार करणार नाहीत. पण एंजेलिनानं ते डील तोडलं. ब्रॅड पीटनं आता दावा केला आहे की,त्याची पू्र्वाश्रमीची पत्नी एंजेलिना विनीयार्डचा अर्धा हिस्सा रशियन अरबपती यूरू शेफलरची पार्टनर कंपनी टेन्यूट डेल मोंडोला विकून जाणूनबुजून मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच मी तिच्या विरोधात केस दाखल केली आहे. त्यांच्या वकीलांनी कोर्टात शेफलरच्या विरोधातही मुद्दे मांडले आहेत.

हेही वाचा: 'दिग्दर्शकानं मला मेकअप वॅनमध्ये बंद करून...' डिंपल कपाडियांचा मोठा खुलासा

बातमी होती की,युक्रेनवर रशियानं(रूस) केलेल्या हल्ल्यानंतर शेफलरने एक निवेदन जारी केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की,त्यानं पुतिनचा विरोध केल्यामुळे त्याला रशियातून बाहेर हाकलण्यात आलं आहे. तर AFP च्या एका रिपोर्टनुसार, एंजेलिना जोलीनं शेफलर सोबत झालेल्या डीलवर सह्या करण्याआधी पूर्वाश्रमीचा पती अभिनेता ब्रॅड पीटला ऑफर दिली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एंजेलिना जोली च्या विरोधात ब्रॅड पीटनं जी केस दाखल केली आहे,ती पूर्णपणे खोटी आहे. एवढंच नाही,तर या संदर्भातलं सत्य,पुराव्यांच्या रुपात त्यानं अद्याप सादर केलेलं नाही.

हेही वाचा: उर्फी जावेदनं बदललं नावं, नवीन स्पेलिंगमधील 'o' ची चर्चा, कारणही खास

ब्रॅड पीट आणि एंजेलिनानं २००८ मध्ये फ्रान्सच्या साऊथ ईस्ट भागात मासे आणि नीसच्या मध्ये वसलेल्या मिरावल मध्ये भागीदारीत विनियार्डची खरेदी केली होती. २०१४ मध्ये त्यांनी लग्न केलं. ब्रॅड पीटने म्हटलं होतं की, हे युनिट जगातील सर्वात प्रसिद्ध वाइन बनवतं,ज्याचं वार्षिक उत्पन्न ५० मिलियन डॉलरहून अधिक आहे.

हेही वाचा: काजोलचा बॉलीवूडविषयी मोठा खुलासा, 30 वर्ष काम केल्यानंतर आता म्हणतेय...

एंजेलिना आणि ब्रॅड ची भेट २००५ साली 'मिस्टर अॅन्ड मिसेस स्मिथ' च्या सेटवर झाली होती. तिथेच त्यांचे एकमेकांवर प्रेम झालं. खूप वर्ष लीव्ह इन मध्ये राहिल्यावर त्यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. आणि दोनच वर्षात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एंजेलिनानं ब्रॅडवर ब्लॅक मॅजिक करण्याचा आरोप केल्याच्या बातम्या होत्या. आणि त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला. २०२१ मध्ये पुन्हा एंजेलिनानं आपला पूर्वाश्रमीचा पती ब्रॅड पीटवर कौटुंबिक हिंसेचा आरोपही लावला होता. तिनं म्हटलं होतं,घटस्फोटाची केस सुरू असताना ब्रॅड पीटनं आपल्यावर अत्याचार केल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. पण विरोधी पार्टीनं हे पुरावे खोटे असून एंजेलिना बिनबुडाचे आरोप करतेय असं म्हटलं होतं.

Web Title: Brad Pitt Says Angelina Jolie Sought To Inflict Harm With Vineyard

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hollywood
go to top