ब्रह्मास्त्र टीझर Out: मौनीच्या लूकची चर्चा, जाणून घ्या ट्रेलरची रिलीज डेट

विशाखापट्टनम मध्ये सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं टिझर रिलीज केल्यानंतर ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहिर केली आहे.
Brahmastra Teaser Out, trailer release date confirmed
Brahmastra Teaser Out, trailer release date confirmedGoogle

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या बहुप्रतिक्षित-बहुचर्चित ब्रह्मास्त्र'(Brahmastra)' च्या प्रमोशनला आता सुरुवात झाली आहे. विशाखापट्टनम मध्ये सिनेमाच्या प्रमोशनचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. त्याचवेळी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट देखील जाहिर केली आहे. मंगळवारी ३१ मे रोजी 'ब्रह्मास्त्र' मधील आलिया भट्ट,अमिताभ बच्चन, रणबीर कपूर पासून मौनी रॉय पर्यंत सर्वांचेच लूक रिलीज करण्यात आले आहेत. रणबीर आणि आलियाचा लूक तर याआधीच समोर आला होता पण आता टीझर मध्ये एक नवा लूक देखील पहायला मिळत आहे.

'ब्रह्मास्त्र' सिनेमाचा ट्रेलर १५ जूनला रिलीज होणार आहे. ट्रेलर नंतर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची कहाणी अधिक स्पष्ट होईल. चाहत्यांना या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. कोरोनामुळे या सिनेमाची बरीच कामं पुढे ढकलली गेली आणि त्यामुळे प्रदर्शन लांबणीवर ढकललं गेलं.

Brahmastra Teaser Out, trailer release date confirmed
'बोल्ड सीन पाहताना मराठी प्रेक्षक...' तेजस्विनी,प्राजक्ता स्पष्टच बोलल्या

मंगळवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विशाखापट्टनमला रवाना झाले. तिथे पोहोचल्यावर दोघांचं स्वागत गुलाबाची फुलं आणि पुष्पहार घालून मोठ्या दणक्यात करण्यात आलं.

'ब्रह्मास्त्र'च्या टीझर व्हिडीओमध्ये मौनी रॉय चा लूक एकदम हटके दिसत आहे. मौनी खूप आकर्षित करत आहे असं म्हणत सोशल मीडियावर तिची खूप प्रशंसा देखील केली जात आहे.

'ब्रह्मास्त्र'च्या टिझरमध्ये अमिताभ बच्चनचा लूक देखील पहायला मिळत आहे. या लूकमध्ये ते जॅकेट,शर्ट आणि ब्लॅक पॅंटमध्ये डॅशिंग दिसत आहेत.

Brahmastra Teaser Out, trailer release date confirmed
Photo: हृता दुर्गुळेची 'हनिमून डायरी' पाहिलीत का?

'ब्रह्मास्त्र' मध्ये अमिताभ बच्चन,आलिया भट्ट,रणबीर कपूर आणि मौनी रॉयसोबत साऊथ सुपरस्टाप अक्किनेनी नागार्जुन देखील दिसणार आहे. या टीझरमध्ये नागार्जुनचा लूकही निर्माते-दिग्दर्शकानं रिलीज केला आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com