Brahmastra Trailer : हॉलीवूडलाही लाजवेल असा 'ब्रम्हास्त्र', ट्रेलरनं भरेल धडकी!

कधी शिव, तर कधी हनुमान तर कधी सर्वसामान्य माणूस. यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वातून वेगळेपणाचा शोध घेणारा ब्रम्हास्त्र (Bollywood Movies) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
ranbir bramhastra trailer
ranbir bramhastra traileresakal

Brahmastra Trailer Out: कधी शिव, तर कधी हनुमान तर कधी सर्वसामान्य माणूस. यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वातून वेगळेपणाचा शोध घेणारा ब्रम्हास्त्र (Bollywood Movies) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही वेळातच त्याला लाखो व्ह्यजु मिळाले आहेत. प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिय भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेल्या ब्रम्हास्त्रच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही (Entertainment News) वर्षांपासून ब्रम्हास्त्र चित्रपटाची चर्चा होती. कोरोनाचा फटका अनेक चित्रपटांना बसला होता. त्यात या चित्रपटाचा देखील समावेश होता.

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्याही यात भूमिका आहेत. (Bollywood Actors) अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात सुरु होणाऱ्या ब्रम्हास्त्रच्या ट्रेलरनं आता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सर्व सामान्य माणूस ते देवत्व असा प्रवास आपल्याला दिसून येतो. (Bollywood Celebrity) जगात अजुनही काही वाईट शक्ती कार्यरत आहेत. त्यांचा बिमोड करण्यासाठी कुणा एकाला जन्म घ्यावा लागतो. तो आता पुन्हा आला आहे. त्याला या सगळ्या शक्तींचा पराभव करायचा आहे. मात्र त्यासाठी त्याला मनुष्य रुपात यावं लागेल. तो आला आहे.

ब्रम्हास्त्रच्या तांत्रिक बाजुंविषयी बोलायचे झाल्यास त्यातील ग्राफीक्स लक्षवेधी आहे. अॅक्शन सीन देखील प्रभावी आहेत. टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन देखील या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या ट्रेलरमधील त्याच्या हटके लुकनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सप्टेंबरमध्ये ब्रम्हास्त्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे ट्रेलरच्या शेवटी सांगण्यात आले आहे.

ranbir bramhastra trailer
सेटवर अचानक बिघडली दीपिका पदुकोनची तब्येत
ranbir bramhastra trailer
सलमान खान धमकी प्रकरणाची महाराष्ट्र पोलिस गॅंगस्टर बिष्णोईची करणार चौकशी

कोरोनाचा मोठा फटका ब्रम्हास्त्रला बसला होता. त्यामुळे त्याच्या चित्रिकरणात मोठा अडथळाही आला होता. त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. ब्रम्हास्त्रचा पुढचा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे या ट्रेलरमध्ये सांगण्यात आले आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com