Brahmastra  Part One Review in Marathi
Brahmastra Part One Review in MarathiSakal Digital

Brahmastra Review: नुसताच 'लखलखाट', पदरी 'भ्रमनिरास्त्र'

हॅरी पॉटर, अॅव्हेंजर, ट्विलाईट सागा, सारख्या चित्रपटांमध्ये रमणाऱ्या प्रेक्षकांना त्यांचा इंडियन अवतार म्हणून ब्रम्हास्त्रचे स्वागत करता येईल.

Brahmastra: Part One Review In Marathi

हॅरी पॉटर, अॅव्हेंजर, ट्विलाईट सागा, सारख्या चित्रपटांमध्ये रमणाऱ्या प्रेक्षकांना त्यांचा इंडियन अवतार म्हणून ब्रम्हास्त्रचे स्वागत करता येईल. गेल्या काही वर्षांपासून ब्रम्हास्त्रची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तब्बल चारशे कोटींपेक्षा जास्त बजेट असणाऱ्या या चित्रपटानं साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावरुन काही वादही समोर आले आहेत. रणबीर- आलियानं त्या वादाचा फायदा घेऊन चांगले प्रमोशनही केले आहे. प्रत्यक्षात चित्रपट पाहिल्यावर सारे श्रेय हे व्हिएफक्स, छायाचित्रण आणि कॅमेरामन यांना द्यावे लागेल. असे आवर्जुन सांगावे लागेल. पावणेतीन तासांच्या ब्रम्हास्त्रमध्ये शिवा (रणबीर कपूर) आगीचे गोळे हातात घेऊन ईशावर (आलिया भट्ट) फेकताना दिसतो.

ब्रम्हास्त्रची तुलना हॉलीवूडशी केल्यास हा तांत्रिकदृष्ट्या तयार झालेला उत्तम चित्रपट म्हणून त्याविषयी सांगता येईल. अयान मुखर्जीनं गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ या चित्रपटासाठी मेहनत घेतली होती. त्याचे त्यानं चीज केलं आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध कमालीचा कंटाळवाणा आहे. मात्र उत्तरार्धात दिग्दर्शकानं चांगलाच रंग भरला आहे. त्यामुळे ब्रम्हास्त्र वेगळ्याच उंचीवर गेला आहे. थिएटरमध्ये ब्रम्हास्त्र पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे. टू डी पेक्षाही तो थ्रीडी पाहिल्यास वेगळा फिल आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं काही तांत्रिकदृष्ट्या छान जमलं आहे. मात्र कथेत काही गोष्टींची उणीव ही जाणवतेच. (Brahmāstra Part One Cast)

आलिया, रणबीर, अमिताभ, नागार्जुन, मौनी रॉय, यासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. काही करुन आपल्याला ब्रम्हास्त्रावर वर्चस्व मिळवायचे आहे यासाठीची ही लढाई आहे. पूर्वी जसे मालिकांमध्ये देवगण आणि राक्षसगण यांच्यातील भांडणं सुरु असायची. अमृतकलशासाठी त्यांनी केलेली भांडणं नवीन नाहीत. ब्रम्हास्त्र देखील थोड्याफार फरकानं याच वळणानं जातो. तुम्ही तर अॅव्हेंजर एंडगेम पाहिला असेल तर त्यात ज्या प्रकारचे अॅक्शन सीन आहेत त्याच धाटणीचे ते तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. त्याच धर्तीवर संगीत योजना, प्रकाश योजना, स्टंट, हे सारं लक्ष वेधून घेताना दिसते.

ब्रम्हास्त्रचे संरक्षण करण्याची जबाबदारी काही जणांवर देण्यात आली आहे. त्यात दोन जणांकडे त्याचे तुकडे आहेत. एक आर्टिस्ट (नागार्जुन) दुसरा सायंटिस्ट (शाहरुख खान) दुसरीकडे देव नावाच्या अग्नी अस्त्रधारी गणाला तिसरा तुकडा हवा असून त्यासाठी त्यानं त्याची सगळी माणसं त्याच्या शोधात लावली आहेत. पुराणकाळापासून सुरु असलेला हा शोध आणि त्या ब्रम्हास्त्राची सुरक्षा ही विसाव्या शतकापर्यत येवून पोहचली आहे. शिवा नावाच्या पंचवीशीतल्या युवकाकडे महत्वाी भूमिका सोपवण्यात आली आहे. त्यामुळे तो कोण आहे, त्याला एवढे महत्व का आहे, हे जाणून घेण्यासाठी ब्रम्हास्त्राच्या वाट्याला जावं लागेल.

Brahmastra  Part One Review in Marathi
Bramhastra: आलिया - रणबीरला 'बजरंग दलाचा' दणका!

ब्रम्हास्त्र पाहताना त्यातील कथा ही म्हणावी अशा प्रभावी अंगानं आपल्यासमोर येत नाही. त्यात एक अपुरेपणा जाणवतो. जे कलाकार आहेत त्यांची ओळख काही केल्या प्रस्थापित होत नाही. जसं की चित्रपटाच्या सुरुवातीला शाहरुख खान दिसतो. तो एक सायंटिस्ट आहे. त्याला मारण्यासाठी काहीजण येतात. ब्रम्हास्त्रचा एक तुकडा हा त्याच्याकडे आहे, त्याचे नाव नंदीअस्त्र असे आहे. हे सगळं पाहताना काही वेळ चक्रावून गेल्यासारखे होते. म्हणून तर ब्रम्हास्त्रचा पहिला भाग हा कमालीचा गोंधळून टाकणारा आहे. चित्रपटाला वेग येतो तो मध्यंतरानंतर....

* रणवीर - आलियाबद्दल काय बोलावं....

रणवीर आलिया यांनी पहिल्यांदाच एकत्रित ब्रम्हास्त्रच्यानिमित्तानं काम केले आहे. त्यात त्यांच्या भूमिका ठीकठाक आहे. आलिया कोण आहे. कुठून आली, पहिल्या काही मिनिटांतच ती रणबीरच्या प्रेमात पडते. लंडनवरुन आलेली मुलगी मुंबईतल्या एका डीजेचं काम करणाऱ्या मुलावर भाळते. त्याच्यासोबत पार्टिला जाते. नंतर दुसऱ्या भेटीत थेट वाराणसी... हे सारं चक्रावून टाकणारं आहे. तरीही या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलिया - रणबीरनं त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

Brahmastra  Part One Review in Marathi
Alia Bhatt ला Boycott करा...; आमिर-अक्षयनंतर आता आलियावर भडकले लोक

* पाहावा की पाहू नये....

ज्यांना हॉलीवूडच्या अॅक्शनपटांमध्ये रस आहे. अशांसाठी हा चित्रपट चांगला ऑप्शन आहे. आपण अॅव्हेंजर, स्पायडर मॅन, आर्यनमॅन सारखे हॉलीवूडपट इंजॉय करतो त्याच तोडीचा चित्रपट बनवण्यात दिग्दर्शक अयान मुखर्जीला काही अंशी यश आले आहे. यात मोठा वाटा तांत्रिक बाबींचा आहे. त्याचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. ब्रम्हास्त्रचा पहिला भाग आता प्रदर्शित झाला आहे. अजुन दोन भाग प्रदर्शित होणे बाकी आहे. त्यामध्ये काय होणार याची उत्सुकता पहिल्या भागानं किंचिंतशी वाढवली आहे. त्याचे काय आहे की, ओटीटीवर एवढे सस्पेन्स टाईप चित्रपट आणि मालिका आल्या आहेत की आता प्रेक्षकांना पुढील भागात काय होणार याचा अंदाज बांधायला फारसा वेळ लागत नाही. (Brahmastra Hindi Movie Budget)

* दीपिका आहे की नाही?

ब्रम्हास्त्रमध्ये कोणकोणत्या सेलिब्रेटींचा समावेश करण्यात आला आहे याची मोठी उत्सुकता होती. त्यानुसार बॉलीवूडमधले अनेक दिग्गज स्टार सेलिब्रेटींची हजेरी या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दीपिक चमकली आहे. तिचा संदर्भ पुढील भागात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ब्रम्हदेवाच्या रुपात असणारा तो कोण आहे याविषयी मात्र कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटात शेवटी ते ओझरतं दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे.

चित्रपट - ब्रम्हास्त्र

दिग्दर्शक - अयान मुखर्जी

कलाकार - अमिताभ बच्चन, नागार्जुन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय

रेटिंग - **1/2 (अडीच स्टार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com