करण आणि अनुषा गेली पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अनुषाच्या बहिणीच्या लग्नात ते दोघं एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली होती. मात्र, अचानक आता ही जोडी वेगळी झाली आहे.
व्हीजे अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा या कपलचे कित्येक फॅन्स आहेत. या कपलला सोशल मीडियावर कित्येक लाईक्स मिळत असतात. छोट्या पडद्यावर गाजलेले आणि लोकप्रिय ठरलेलं हे कपल. परंतु आता या जोडीला गालबोट लागलं आहे. करण आणि अनुषा यांच्यामध्ये आता ब्रेकअप झाला आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
वय वाढलं म्हणून काय झालं भाऊ, अजूनही 'ब्युटी' कडक
खरं तर त्या दोघांमध्ये धुसपूस साधारण एक वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. दोघं आता लवकरच विभक्त होतील, अशी टीव्ही इंडस्ट्रीत चर्चाही होती. मात्र, आता अनुषानं आपला करणबरोबर ब्रेकअप झाल्याचं सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहून जाहीर केलं आहे.
करण आणि अनुषा गेली पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अनुषाच्या बहिणीच्या लग्नात ते दोघं एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली होती. मात्र, अचानक आता ही जोडी वेगळी झाली आहे.
'आईला हॉट फोटो शुट केल्याचे सांगितलं होतं' ; वनितानं सांगितला अनुभव