अदाकारीपेक्षा 'नेकलेसचाच' नखरा, बेलाची कान्समध्ये 'हवा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bela hadid

अदाकारीपेक्षा 'नेकलेसचाच' नखरा, बेलाची कान्समध्ये 'हवा'

मुंबई - ज्या चित्रपट महोत्सवाची साऱ्या जगाला उत्सूकता असते तो कान्स चित्रपट महोत्सव जाणकारांच्या चर्चेचा विषय असतो. समीक्षक, अभ्यासक, चाहते या महोत्सवाची आतूरतेनं वाट पाहत असतात. कोरोनामुळे या महोत्सवावर तो रद्द करण्याचे सावट होते. मात्र कोरोना प्रतिबंधविषयक सर्व नियमांचे पालन करुन तो करण्य़ाला परवानगी देण्य़ात आल्याची माहिती आहे. त्यात जगभरातील वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. (cannes 2021 bella hadid looks amazing golden lung necklace and black dress yst88)

सध्या कान्समध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री बेला हदीदची (bela hadid) मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. तिनं जो नेकलेस घातला आहे त्यामुळे तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कान्स चित्रपट महोत्सवाची (cannes film festival) घोषणा आता झाली आहे. 6 जुलैला सुरु झालेला हा महोत्सव 17 जुलैपर्यत चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरवेळी बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील सेलिब्रेटी त्यात सहभागी होत असतात. यापूर्वी भारतातील ऐश्वर्या रॉय आणि प्रियंका चोप्रा यांची वेशभूषाही बराच काळ चर्चेत होती.

हेही वाचा: 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा

हेही वाचा: पवित्र रिश्ता 2: अभिज्ञा भावे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

रेड कार्पेटवर बेलाच्या वॉकनं सर्वांना चकित केलं आहे. विदेशी सुपर मॉडेल म्हणून बेला परिचित आहे. त्यामुळे बेला हदीदचा अनोखा लूक सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. कान्सच्या 2021 च्या रेड कार्पेटवर जेव्हा बेलानं पाय ठेवला तेव्हापासून ती सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या त्या हटके लुकनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. 24 वर्षां्च्या या मॉडेलनं ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. तिच्या ड्रेसनं नव्हे तर नेकलेसनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

टॅग्स :Bollywood News