पवित्र रिश्ता 2: अभिज्ञा भावे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवित्र रिश्ता 2: अभिज्ञा भावे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

पवित्र रिश्ता 2: अभिज्ञा भावे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' Pavitra Rishta या प्रसिद्ध मालिकेमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या Ankita Lokhande जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेला 12 वर्षे पूर्ण झाली असून लवकरच या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'पवित्र रिश्ता 2' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'पवित्र रिश्ता 2'मध्ये अंकिता लोखंडे, उषा नाडकर्णी आणि शाहिर शेख हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या नवीन मालिकेत सुशांतची जागा अभिनेता शाहिर शेखने घेतली आहे. (Abhijna Bhave will play an important role in Pavitra Rishta 2 pvk99)

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील या मालिकतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे यांसारख्या मालिकेमधील अभिज्ञाच्या अभिनाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता 'पवित्र रिश्ता 2'मध्ये अभिज्ञाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

हेही वाचा: 'रोडीज' फेम रणविजय दुसऱ्यांदा झाला बाबा

'पवित्र रिश्ता 2' या मलिकेत सुशांतने साकारलेल्या मानव या भूमिकेत शहिर दिसणार असून अर्चना ही भूमिका अंकिता साकारणार आहे. मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमधील अंकिता आणि शाहिरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. अंकिताने या मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हि़डीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. शाहिरसोबतचा फोटो शेअर करू अंकिताने त्याला कॅप्शन दिले, 'काही लव्ह स्टोरी या विलक्षण असतात. मानव आणि अर्चनाच्या या विलक्षण लव्हस्टोरीची मी साक्षीदार आहे, याचा मला आनंद आहे. पवित्र रिश्ता-2 लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे.'

हेही वाचा: सोनालीला पुण्यात करावा लागला होता वर्णभेदाचा सामना