Cannes Film Festival च्या रेडकार्पेटवर आली रक्तानं माखलेली महिला अन् उडाला एकच गोंधळ..पहा व्हिडीओ

गेल्यावर्षी एका महिलेनं कान्सच्या रेडकार्पेटवर स्वतःचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता,त्यावेळी देखील एकच खळबळ उडाली होती.
Cannes Film Festival Viral Video
Cannes Film Festival Viral VideoEsakal

Cannes Film Festival Viral Video: यंदाचं कान्स फिल्म फेस्टिव्हल सिनेमांच्या प्रीमियरमुळे आणि तिथे हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींमुळे भलताच चर्चेत आहे. पण आत कान्समध्ये असं काही घडलं ज्यानंतर पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हल चर्चेत आला आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर एक महिला पोहोचली तेच रक्तानं माखलेली..अर्थात ते रक्त खोटं होतं.

महिलेनं यावेळी युक्रेनच्या झेंड्यातील रंगांच्या कपड्याचा ड्रेस घातला होता, ज्यावेळी हे घडलं तेव्हा 'अॅसिड' सिनेमाचं स्क्रिनिंग सुरू होतं. बोललं जात आहे की महिलेनं युक्रेनच्या समर्थनार्थ कान्सच्या रेड कार्पेटवर विरोध प्रदर्शन केलं. अद्याप ती महिला कोण होती याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Cannes Film Festival 2023 woman dressed in ukrainian colours pours fake blood herself in support of ukraine )

Cannes Film Festival Viral Video
Viral News: झोपडपट्टीतल्या मुलीनं नाव काढलं!धारावीत राहणारी १४ वर्षीय मुलगी बनली ब्युटी ब्रॅन्डचा चेहरा..

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की महिला एकदम आरामात चालत या रेड कार्पेटवर येते आणि तिथल्या जिन्यांवरनं चढून थोडं वर जाते आणि उभी राहते. यानंतर ती आपल्या कपड्यांच्या आतून लाल रंगाचं खोटं रक्त असलेल्या दोन पिशव्या बाहेर काढते आणि आपल्या अंगावर ते लाल रंगाचं द्रव्य ओतते. हे पाहताच तिथले सुरक्षारक्षक धावत तिच्याजवळ येताना दिसतात आणि तिला त्या जिन्यावरनं खाली आणतात आणि तिथून बाहेर नेलं जातं.

Cannes Film Festival Viral Video
'Khatron Ke Khiladi 13' मध्ये भाग घेणं नायरा बॅनर्जीला पडलं महाग..अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर किड्यांनी चक्क..

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की गेल्यावर्षी कान्स दरम्यान एका महिलेनं युक्रेनच्या समर्थनार्थ आपले कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या शरीरावर युक्रेनचा झेंडा लपेटलेला होता आणि त्यावर लिहिलं होतं,'आमचा बलात्कार करणं बंद करा'.

गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध पुकारलं गेलं होतं. गेल्या दीड वर्षात युक्रेनला या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. रशियानं सुरुवातीला कीव आणि खारकीव सारख्या शहरांवर खूप बॉम्ब हल्ले केले होते. कान्सआधी अनेक मोठ्या कार्यक्रमातनं रशियाच्या विरोधात आणि युक्रेनच्या समर्थनार्थ विरोध प्रदर्शन करण्यात आलं आहे.

Cannes Film Festival Viral Video
CID Actor Death: CID मालिकेत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू.. घरातील बाथरुममध्ये मिळाला मृतदेह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com