Viral News: झोपडपट्टीतल्या मुलीनं नाव काढलं!धारावीत राहणारी १४ वर्षीय मुलगी बनली ब्युटी ब्रॅन्डचा चेहरा..

२०२० मध्ये हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅननं मलीशाला शोधलं होतं जेव्हा तो एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता.
Viral News 14 year old mumbai dharavi girl beacame brand ambassador for beauty brand
Viral News 14 year old mumbai dharavi girl beacame brand ambassador for beauty brand Esakal

Viral News: मुंबईत धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १४ वर्षीय मलीशा खारवा हिची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

२०२० मध्ये हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅननं मलीशाला शोधलं होतं जेव्हा तो एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता. त्यानंतर त्यानं या मुलीसाठी नवीन इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं.

१४ वर्षाच्या मलीशा खारवाचे इन्टाग्रामवर यावेळेला २ लाख २५ हजारहून अधिक फॉलोअर आहेत. (14 year old mumbai dharavi girl beacame brand ambassador for beauty brand)

Viral News 14 year old mumbai dharavi girl beacame brand ambassador for beauty brand
CID Actor Death: CID मालिकेत काम करणाऱ्या 'या' अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू.. घरातील बाथरुममध्ये मिळाला मृतदेह

मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहणारी मलीशानं गेल्या वर्षभरात अनेक मॉडेलिंग गिग्ग बनवले आहेत. तसंच 'लिव्ह युअर फेअरीटेल' नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये तिनं काम केलं आहे. आता तिच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे की तिला फ़ॉरेस्ट इसेंशियल्स च्या एका अभियानाचं ब्रॅन्ड एम्बेसेडर बनवलं आहे. या अभियाना मागचा या ब्रॅन्डचा उद्देश्य आहे तो म्हणजे युवा पिढीला मानसिकरित्या सक्षम बनवणे.

फॉरेस्ट इसेंशियल्सनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये मलीशाला त्यांच्या स्टोरमध्ये एन्ट्री करताना आणि तिथल्या अभियानाची जाहिरात करणाऱ्या पोस्टर्ससोबत स्वतःचे फोटो क्लिक करवून घेताना दिसते.

या क्लीपला शेअर करत ब्रान्डनं लिहिलं आहे की,'आपल्या स्वप्नांना समोर पाहून या मुलीचा चेहरा आनंदानं चमकला आहे'.

Viral News 14 year old mumbai dharavi girl beacame brand ambassador for beauty brand
Ranbir Kapoor ने अर्ध्यावरच सोडून दिलेला 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा.. मात्र याच सिनेमानं फळफळलं होतं हृतिकचं नशीब
Viral News 14 year old mumbai dharavi girl beacame brand ambassador for beauty brand
'Khatron Ke Khiladi 13' मध्ये भाग घेणं नायरा बॅनर्जीला पडलं महाग..अभिनेत्रीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर किड्यांनी चक्क..

या व्हिडीओला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर कमेंट करत एका इन्स्टाग्राम युजरनं लिहिलं आहे की,'हिला यश मिळवताना पाहून खूप छान वाटतंय. हिला खूप सारे आशीर्वाद आणि भविष्यात हिला चांगलं यश मिळो'.

आणखी एका व्यक्तीनं लिहिलं आहे की, 'हे पाहून खूप आनंद झाला कारण आपल्या देशात सावळ्या रंगाच्या मुलींना ब्युटी ब्रान्डसाठी योग्य समजलं जात नाही..पण आता काळ बदलतोय..हे खूप स्वागतार्ह आहे'.

फॉरेस्ट इसेन्शिअल्सचे संस्थापक मीरा कुलकर्णी यांचे म्हणणे आहे की, ''आम्ही केवळ मलीशाच्या स्वप्नांना मोठं करणार नाही आहोत तर आजच्या सबंध युवा पिढीच्या वैचारिकतेला सशक्त बनवण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रोजेक्टचा मूळ हेतूच हा असेल. मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आमचं योगदान असणार आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com