Cannes Film Festival यंदा गाजवला मराठी माणसानं.. अशोक राणेंना 'सत्यजित रे स्मृती' पुरस्कार

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधल्या इंडिया पॅव्हेलियन इथं हा कार्यक्रम पार पडला. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
Cannes Film Festival Update
Cannes Film Festival UpdateEsakal

Cannes Film Festival Update: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान ज्येष्ठ चित्रपट-समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे यांना यंदाचा ' सत्यजित राय स्मृती पुरस्कार ' प्रदान करण्यात आला.

फिप्रेस्की या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षा इसाबेल डॅनल यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. राणे यांना देण्यात आला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधल्या इंडिया पॅव्हेलियन इथं हा कार्यक्रम पार पडला. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

काही दिवसांपूर्वी राणे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. फिप्रेस्की इंडिया या संस्थेतर्फे सिनेमासंदर्भातलं उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यापुर्वी अरुणा वासूदेव (२०२१) प्रो. शनमुगदास (२०२२) यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे.

अशोक राणे हे गेली ४६ वर्ष चित्रपटासंदर्भात लेखन करत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजवर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते मराठीतले एकमेव लेखक आहेत.(Cannes Film Festival Update Ashok Rane Awarded Satyajit Ray Award)

Cannes Film Festival Update
Cannes Film Festival च्या रेडकार्पेटवर आली रक्तानं माखलेली महिला अन् उडाला एकच गोंधळ..पहा व्हिडीओ

फिप्रेस्की या सिनेमा समीक्षकांच्या संघटनेची स्थापना १९३० ला ब्रुसेल्स, बेल्जियम इथं झाली. त्याच्या भारतीय शाखेची म्हणजे फिप्रेस्की इंडियाची सुरूवात १९९२ ला झाली. तेव्हापासून सिनेमा समीक्षण, सिनेमा लिखाणासंदर्भात ही संघटना काम करत आहेत. देशभरातून ४० हून अधिक सदस्य या संघटनेचा भाग आहेत.

अशोक राणे यांनी मराठीतून जागतिक सिनेमावर आजवर विपुल लेखन केलंय. याशिवाय त्यांनी इंग्रजीतूनही बरेच लेखन केले आहे. चित्रपट समीक्षा लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा आणि ओळख निर्माण केली आहे.

१९९५ ला सिनेमाची चित्रकथा या पुस्तकासाठी अशोक राणे यांना पहिल्यांदा सिनेमा लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २००३ ला सर्वोत्कृष्ट सिने-समीक्षक म्हणून आणि सिनेमा पाहणारा माणूस या त्यांच्या आत्मचरीत्रात्मक पुस्तकासाठी ही राष्ट्रीय पुरस्कार असा तीनदा राष्ट्रीय पातळीवर त्यांचा गौरव झालेला आहे.

Cannes Film Festival Update
Viral News: झोपडपट्टीतल्या मुलीनं नाव काढलं!धारावीत राहणारी १४ वर्षीय मुलगी बनली ब्युटी ब्रॅन्डचा चेहरा..

सिनेमाची चित्रकथा (१९९५), चित्र मनातले (१९९६), अनुभव (१९९७) चित्रपट एक प्रवास (२००१) सख्ये सोबती (२००३) व्ह्यूस एन्ड थॉट्स ऑन स्क्रीप्ट रायटींग (२००६) मोन्ताज (२०१५) आणि सिनेमा पाहणारा माणूस (२०१९) अशी अशोक राणे यांची साहित्य संपदा आहे.

Cannes Film Festival Update
Suhana Khan: सावळ्या रंगावरनं सुहाना खानला हिणवलं जायचं..म्हणाली,'मी १२ वर्षांची होते तेव्हा लोक माझ्या तोंडावर..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com