'मेरे देश की धरती' चित्रपटाबाबत कार्निव्हल मोशन पिक्चर्स ग्रुपने घेतला 'हा' निर्णय

संतोष भिंगार्डे
Monday, 27 July 2020

दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. जनमानसापर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा हा चित्रपट एक ‘पेट्रियोटिक ड्रामा’ आहे.

मुंबई : कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत आहे. अनलॉकचा तिसरा टप्पा आता सुरू होत आहे. सरकारने काही अटी आणि शर्थीसह चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांचेही चित्रीकरण सुरू होत आहे. 

'तो' व्हिडिओ डोंबिवलीतील नव्हेच; व्हायरल व्हिडिओचं सत्य अखेर उघड... 

आता 'कार्निवल मोशन पिक्चर्स' या संस्थेनेही आपला आगामी चित्रपट 'मेरे देश की धरती' प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्निवल ग्रुपची निर्मिती असलेला 'मेरे देश की धरती' हा नवा कोरा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. 

हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....​

दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. जनमानसापर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा हा चित्रपट एक ‘पेट्रियोटिक ड्रामा’ आहे. भोपाळमधील सेहोर जिल्ह्यासह मुंबई आणि आसपासच्या भागात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन फराज हैदर यांनी केलं आहे. सध्या चित्रपटगृहे बंद आहेत. कधी उघडतील हे काही सांगता येत नाही. परंतु चित्रपटगृहे उघडताच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय कार्निव्हल मोशन पिक्चर्स ग्रुपने घेतला आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carnival motion pictures took big decision about movie mere desh ki dharati