#RIPCartoonNetwork: कार्टून नेटवर्कने दिली प्रतिक्रिया म्हणाले,“आम्ही मेलो नाही फक्त ...

वॉर्नर ब्रदर्समध्ये विलीनीकरणानंतर सुरु झालेल्या #RIPCartoonNetwork ट्रेंडला दिले प्रतिउत्तर...
#RIPCartoonNetwork
#RIPCartoonNetworkesakal

कार्टून म्हणजे लहान मुलांचा जिव्हाळ्याचा विषय. लहान मुलांच्या मनोरंजनाचे ते एक माध्यम आहे. टीव्हीवर अनेक कार्टून चॅनेल्स आहेत जी मुले आव़डीने पहातात. जगातील आणि देशातील सर्वात जुने कार्टून चॅनल हे 'कार्टून नेटवर्क' आहे. 'टॉम अँड जेरी', 'पॉवर पफ गर्लस', 'बेन 10' ही कार्टून्स् अजूनही मोठ्या आवडीने लोक पाहतात. मात्र काही दिवसांनी #RIPCartoonNetwork हा  ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#RIPCartoonNetwork
World Students' Day 2022: विद्यार्थ्यांसह पालकांनीही एकदा पहाच ‘हे’ चित्रपट

या ट्रेंडमुळे कार्टून नेटवर्क चॅनलने मोठा निर्णय घेतला आहे. कार्टून नेटवर्कने वॉर्नर ब्रदर्समध्ये विलीन होण्याची घोषणा केली आहे. या विलीनीकरणामुळे कार्टून नेटवर्कमध्ये अनेक मोठे बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. याविलीनीकरणामुळे चाहते खूश नाही आहेत.त्यामुळेच #RIPCartoonNetwork हे ट्विटरवर ट्रेंड करत आहे.महत्वाचे म्हणजे कार्टून नेटवर्क आणि वॉर्नर ब्रदर्स अॅनिमेशनच्या विलीनीकरणानंतर, वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन समूहाने आपल्या 25 टक्क्यांहून अधिक कामगारांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा केलीय. त्यामुळे आता कार्टून्स् आणि अॅनिमेशनचे काय होणार याबाबत चिंता होती. त्यामुळे गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली.  

हा गोंधळ कमी करण्यासाठी कार्टून नेटवर्कने स्पष्टीकरण देत एक ट्विट केले आहे. यात "तुम्ही सर्व आम्ही अजुन मेलेलो नाही, आम्ही फक्त 30 वर्षांचे झालो आहोत. आम्ही कुठेही जात नाही. गोंडस आणि नाविन्यपूर्ण व्यंगचित्रांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी होतो आणि राहू. लवकरच येणार आहे ! #CartoonNetwork #CN30 #30andthriving #CartoonNetworkStudios #FridayFeeling #FridayVibes,” म्हटंल आहे.

त्यामुळे आता कार्टून्स् बंद होणार का? ते पुन्हा आपले मनोरंजन करु शकणार नाही असे प्रेक्षकांना वाटत होते. दरम्यान, चॅनल बंद होण्याच्या बातमीबाबत कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही ,तरी पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे असेल कारण तो लहानांपासुन मोठ्यांप्रर्यंन्त सर्वांच्याच मनोरंजनाचा विषय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com