'वरण भात लोन्चा' भोवला, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल |Case registered against actor director Mahesh Manjrekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjrekar

'वरण भात लोन्चा' भोवला, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Mahesh Manjrekar: आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांची (Marathi Movie) ओळख आहे. ते गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत आले आहे. त्यांचा वरणभात लोंचा कोन नाय कोंचा हा चित्रपट काही (Entertainment News) दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या ट्रेलरवरुन प्रेक्षकांनी मांजरेकरांवर टीका करण्यात आली होती. अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगानं देखील याची दखल घेतली होती. यासगळ्या प्रकरणात आता मांजरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्कोच्या सेक्शन 292, 34 तसेच आयटी सेक्शन 67 आणि 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासगळ्या प्रकरणामुळे मांजरेकरांची डोकेदुखी वाढली आहे. वास्तविक वरण भात लोंचा प्रदर्शित होण्यापूर्वी पासून या चित्रपटाच्या वादाला सुरुवात झाली होती. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतला होता. तसेच चित्रपटातील दृष्य वगळावी असे सांगण्यात आले होते. मात्र मांजरेकर हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. अखेर महिला आयोगाला देखील त्यांच्या वरण भात लोंचा चित्रपटाच्या ट्रेलरची दखल घ्यावी लागली होती. आता माहिम पोलिसांनी मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यात लहान मुलांचे वादग्रस्त चित्रिकरण, अश्लील प्रसंग, अल्पवयीन मुलांचे नकारात्मक चित्रिकरण असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे.

मांजरेकर दिग्दर्शित 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शनाआधी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवरून विविध स्तरांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ट्रेलरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे, त्याबाबत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावं अशी मागणी केली होती. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून महेश मांजरेकरांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविण्यात आलं होतं.