esakal | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा बारकाईने अभ्यास सुरू - CBI
sakal

बोलून बातमी शोधा

sushant-singh-rajput

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा बारकाईने अभ्यास सुरू - CBI

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांनी गेल्या वर्षी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास सीबीआयकडे CBI सोपवण्यात आला होता. सुशांतच्या मृत्यूला वर्ष पूर्ण झालं असून सीबीआयने आता त्याच्या तपासाविषयी माहिती दिली आहे. 'सुशांतच्या मृत्यूशी संबंधित तपास अद्यापही सुरू आहे आणि या प्रकरणातील सर्व बाबींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे', अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने अनेक लोकांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र त्यापुढे या केसमध्ये पुढे काय झालं, हे कोणालाच माहित नाही. (CBI official on sushant singh rajput death case current status)

ऑक्टोबर २०२० मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील (एम्स) टीमने सीबीआयकडे सुशांतच्या शवविच्छेदनाचा अंतिम रिपोर्ट सोपवला होता. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरा रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करून सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता.

हेही वाचा: Sushant Singh Case : आतापर्यंत काय घडलं? समजून घ्या संपूर्ण टाइमलाइन

१४ जून २०२० रोजी सुशांतचा वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी त्याच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून यात सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top