esakal | सेलिब्रेटी बाप्पा! दरवर्षी पर्यावरणपूरक उत्सवावरच भर - शरद केळकर 
sakal

बोलून बातमी शोधा

सेलिब्रेटी बाप्पा! दरवर्षी पर्यावरणपूरक उत्सवावरच भर - शरद केळकर 

अभिनेता शरद केळकर यांच्या घरी 35 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी नियमांचे पालन होतेच. यंदाही त्याचा उत्सव साधेपणानेच साजरा होणार आहे... 

सेलिब्रेटी बाप्पा! दरवर्षी पर्यावरणपूरक उत्सवावरच भर - शरद केळकर 

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

अभिनेता शरद केळकर यांच्या घरी 35 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी नियमांचे पालन होतेच. यंदाही त्याचा उत्सव साधेपणानेच साजरा होणार आहे... 

आमच्या घरी गेली 35 वर्षे पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोना संकटकाळामुळे आपल्याला सरकारी नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करायचा आहे. आमच्याकडच्या उत्सवाला दरवर्षीच जवळची काही मोजकीच मंडळी येतात. आम्ही सगळ्यांना आमंत्रण देत नाही, पण ज्यांना माहीत आहे की माझ्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो ती मंडळी आवर्जून दर्शनाला येतात. आमच्या घरची बाप्पाची मूर्ती पूर्णपणे शाडूची असते. मूर्तीप्रमाणे आरासही आम्ही इकोफ्रेंडलीच करतो. दिवसातून दोन वेळा बाप्पाची आरती असते. बाप्पाची पूजा मी स्वतः करतो. त्यामुळे गुरुजींना बोलावण्याचा प्रश्‍नच येत नाही. दरवर्षी आम्ही मूर्तीचे विसर्जन करताना कसलाही गाजावाजा करत नाही. मोजकेच चार जण असतो. 

सेलिब्रेटी बाप्पा! सरकारने घालून दिलेले नियम, तुमच्या-आमच्या सुरक्षेसाठीच - गौरी नलावडे 

मालाडला आमच्या घराजवळ पालिकेने कृत्रिम तलाव केला आहे. तिथे गाडीने जातो आणि मूर्तीचे विसर्जन करतो. यंदाही आम्ही तसेच करणार आहोत. अर्थात गर्दी नसेलच. अनेक वर्षे आम्ही एका गणपती कार्यशाळेतून मूर्ती आणायचो, परंतु या वर्षी घरीच मूर्ती बनवण्याचा माझा मानस आहे. नाही तर माझा एक मित्र घरी मूर्ती बनवतो. त्याच्याकडून आम्ही मूर्ती आणू. 

सेलिब्रेटी बाप्पा! यंदा मूर्ती छोटी, पण उत्साह मोठा - विद्या माळवदे

नियम महत्त्वाचे 
मी दरवर्षी साधेपणाने, जवळचे मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासोबतच गणेशोत्सव साजरा करतो. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. यंदा असलेले नियम मी गेली काही वर्षे पाळत आलोच आहे. मी दरवर्षी जसा गणेशोत्सव साजरा करतो, तसाच यंदाही करणार आहे. 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top