ड्रग्स प्रकरणासंबंधी साऊथ अभिनेत्रीच्या घरावर सीसीबीचा छापा, अभिनेत्रीला घेतलं ताब्यात

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 4 September 2020

शुक्रवारी सकाळी सेंट्रल क्राईम ब्रांच बेंगळुरुने कन्नड सिने अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या घरी धाड टाकली.

मुंबई- सुशांत सिंह प्रकरणात एकीकडे शुक्रवारी सकाळी एनसीबीने रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि शौविकच्या घरी धाड टाकली तर दुसरीकडे ड्रग्स प्रकरणासंबंधी आज शुक्रवारी सकाळी सेंट्रल क्राईम ब्रांच बेंगळुरुने कन्नड सिने अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या घरी धाड टाकली. ३ तास चाललेल्या या धाडीनंतर मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करत रागिणीलाही ताब्यात घेतलं गेलं आहे. 

हे ही वाचा: मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेऊ नकोस, मनसेची कंगनाला धमकी 

सेंट्रल क्राईम ब्रांचच्या टीमने बेंगळुरुमध्ये अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या घरी धाड टाकली आणि तिला ताब्यात घेतलं. क्राईम ब्रांच टीमने जवळपास ३ तास तिच्या घराची झडती घेतली.तसंच रागिणीची तिच्या घरीच काहीवेळ चौकशी केली. याशिवाय तिचा मोबाईल आणि लॅपटॉप देखील जप्त केला. अभिनेत्री रागिणीच्या घरी धाड टाकण्यासाठी पोहोचलेल्या टीमचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये अधिकारी त्यांची ड्युटी करताना दिसत आहेत. 

एका पोलीस अधिका-याने सांगितलं की 'सीसीबीला कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळालं होतं.' पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, 'सीसीबीने याआधी बुधवारीच नोटीस जाहीर केली होती आणि गुरुवारी त्यांच्या समोर हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र रागिणीने तिच्या वकिलांच्या टीमद्वारे सोमवार पर्यंतचा वेळ मागितला होता. मात्र पोलिसांनी तिची ही मागणी फेटाळून लावली आणि तिला शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश दिले.'  

central crime branch conducts 3 hour long raid at kannada actor ragini dwivedi residence


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central crime branch conducts 3 hour long raid at kannada actor ragini dwivedi residence