छवी मित्तलने दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे व्रण, म्हणाली,'हीच या वर्षाची कमाई..' Chaavi Mittal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chaavi Mittal flaunts her breast cancer scars, says..this is what earned in 2022.

Chaavi Mittal: छवी मित्तलने दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे व्रण, म्हणाली,'हीच या वर्षाची कमाई..'

Chaavi Mittal: मालिकानंतर सोशल मीडियावरून आणि वेगवेगळ्या वेब सेगमेंट मधून प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री छवी मित्तलसाठी 2022 हे वर्ष काहीसं कठीण होतं. यावर्षी छवीला ब्रेस्ट कॅन्सरच निदान झालं. यासाठी छवीने एप्रिल महिन्यात एक सर्जरीही केली.

त्यानंतर तिची किमो थेरपी सुरू होती. छवीने ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. आता ती पूर्णपणे फिट आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ते सर्जरी आणि त्यानंतर किमोथेरपीचा प्रवास छवीने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता.

ती सोशल मीडियावरून चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दलची माहिती देत होती. असंख्य वेदना होत असतानाही कशा प्रकारे ती या आजाराचा मजबुतीने सामना करत आहे हे ती तिच्या चाहत्यांना वेळोवेळी सांगत होती. (Chaavi Mittal flaunts her breast cancer scars, says..this is what earned in 2022.)

हेही वाचा: Year End 2022: करोडो रुपये खर्चूनही दणक्यात आपटलेले बॉलीवूडचे बिग बजेट सिनेमा

आता 2022 या वर्षाला निरोप देण्याची वेळ आली आहे. याच निमित्ताने छवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. 2023 या वर्षात प्रवेश करण्याआधी छवीने 2022 या वर्षातील तिने कमावलेली एक गोष्ट फोटोच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही कमावलेली गोष्ट म्हणजे कॅन्सरसोबत लढा देताना तिला मिळालेले व्रण. छबीने शेअर केलेल्या बिकिनीतील फोटोत तिच्या पाठीवर एक मोठा व्रण दिसत आहे. हा व्रण ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचा आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की आता ती आधीपेक्षा जास्त स्ट्रॉंग झाली आहे. आता तिला नवीन आणि अधिक सुंदर आयुष्य मिळालं आहे.

छवीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलंय "तू खूप आदर सन्मान, खूप सारं प्रेम आणि सदिच्छा देखील कमावल्या आहेत ज्या तुझ्यासोबत कायम राहतील." तर अनेक नेटकऱ्यालंनी "तू खूप प्रेरणादायक आहेस" असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा: Gautami Patil: 'मी धमक्यांना घाबरत नाही..'

छवीच स्वतःच यूट्युब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती फिटनेस आणि आरोग्या विषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करते. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करते तसंच महिलांशी निगडित अनेक समस्यांवर भाष्य करत असते.

जीममध्ये वर्कआऊट करत असताना छवीला छातीला दुखापत झाली होती. यासाठी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाच कळलं. त्यानंतर लगेचच तिने उपचार घेण्यास सुरुवात केली. आता छवी पूर्णपणे कॅन्सर मुक्त आहे. मोठ्या सकारात्मकतेने छवीने कॅन्सरवर मात केली आहे.