तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवात 'या' मराठी चित्रपटाची निवड

chaitanya tamhane
chaitanya tamhane

मुंबई- मराठी सिनेसृष्टी आणि रसिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठी माणसाचा उर भरु येईल अशा या बातमीने दिवसाची सुरुवात झालीये. १९३२ सालापासून सुरु असलेल्या प्रसिद्ध 'व्हेनिस चित्रपट महोत्सवात' भारतीय सिनेमाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे हा मराठी सिनेमा आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि प्रसिद्ध मानला जाणारा हा 'व्हेनिस चित्रपट महोत्सव' आहे. १९३२ पासून इटलीमधील व्हेनिस या शहरात सुरु असलेल्या या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय सिनेमाची निवड झाली आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या त्यांच्या सोशल साईटवरुन याबाबत माहिती दिली आहे.

रवी जाधव यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट मराठी आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्या ताम्हाणे याचा डिसायपल. त्रिवार अभिनंदन चैतन्य आणि टीम.' 

तरुण आणि मराठमोळा चैतन्य ताम्हाणे याचं दिग्दर्शन असलेल्या 'डिसायपल' या भारतीय मराठी चित्रपटाची निवड झाल्याने सिनेसृष्टीतून त्याचं आणि त्याच्या टीमचं कौतुक होत आहे. यंदाच्या ७७ व्या 'व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'तील स्पर्धा विभागात याची निवड करण्यात आली आहे. व्हेनिसमध्ये दरवर्षी भरणा-या या महोत्सवात १९३७ साली 'संत तुकाराम' या चित्रपटाला भारतीय चित्रपट जगतातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं.   

chaitanya tamhanes the disciple to compete at venice international film festival  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com