"...हवा येऊ द्या'चे सूत्रसंचालन करणार प्रियदर्शन जाधव

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई : "चला हवा येऊ द्या' म्हटले की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो नीलेश साबळे व त्याची संपूर्ण टीम. पण आता या टीमचा कर्णधार म्हणजेच नीलेश साबळे आता "चला हवा येऊ द्या'च्या रंगमंचावर दिसणार नाही. त्याच्याऐवजी आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन "टाईमपास 2' फेम प्रियदर्शन जाधव करणार आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल; पण पुढील काही दिवस नीलेश प्रकृतिअस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नाही. प्रियदर्शन स्वत: विनोदी अभिनेता, लेखक असल्यामुळे त्याच्यावर काही भागांपुरते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबई : "चला हवा येऊ द्या' म्हटले की सर्वांच्या नजरेसमोर येतो तो नीलेश साबळे व त्याची संपूर्ण टीम. पण आता या टीमचा कर्णधार म्हणजेच नीलेश साबळे आता "चला हवा येऊ द्या'च्या रंगमंचावर दिसणार नाही. त्याच्याऐवजी आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन "टाईमपास 2' फेम प्रियदर्शन जाधव करणार आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल; पण पुढील काही दिवस नीलेश प्रकृतिअस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नाही. प्रियदर्शन स्वत: विनोदी अभिनेता, लेखक असल्यामुळे त्याच्यावर काही भागांपुरते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत प्रियदर्शन जाधव म्हणाला, "मी आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले नाही. वाहिनीने मला विचारले आणि मी होकार दिला. नीलेश साबळे आजारी आहे. तो लवकरच बरा होईल आणि या कार्यक्रमामध्ये पुन्हा सहभागी होईल. मी काही भागापुरताच आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याची संधी कुणी दिली तर मी निश्‍चितच करीन.'  
 

Web Title: Chala hava yeu dya anchor priyadarshan jadhav