esakal | थुकरटवाडीचे विनोदवीर मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

chala hawa yeu dya

थुकरटवाडीचे विनोदवीर मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झाला. पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या झी मराठी वाहिनीवरील लाडक्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर या मालिकांचं चित्रीकरण सुरु असून प्रेक्षकांच्या मनोरंजनात मात्र खंड पडला नाही. या कठीण वेळी सगळ्यांना हसवण्याचा विडा घेतलेले महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर आणि प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' Chala Hawa Yeu Dya जयपूरमध्ये शूटिंगसाठी रवाना झाला होता. पण आता नवीन नियमावलीनुसार मुंबईमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असल्यामुळे हे विनोदवीर मुंबईमध्ये शूटींगसाठी सज्ज झाले आहेत. (chala hawa yeu dya to start shooting in mumbai)

काही कारणांमुळे जयपूरला चित्रीकरणासाठी न गेलेले डॉक्टर निलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे आता नवीन भागांतून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्यामुळे 'चला हवा येऊ द्या'चे जुने आणि नुकतेच सहभागी झालेले नवीन विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी भागात भाऊ अतरंगी अवतारात, त्याच्या भन्नाट कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवणार आहे. तर सागर कारंडे साकारणारा पोस्टमन काका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शूटिंगला परवानगी

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये अनेक मालिकांचे सेट तयार आहेत. आता इथे मालिका आणि चित्रपटांना संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच शूटिंगला परवागनी दिली आहे. अनेक निर्मात्यांनी वेळमर्यादा वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे या नियमांनुसार, ६५ हून अधिक वयोगटातील कलाकार, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील व्यक्तींना शूटिंगच्या सेटवर काम करता येणार नाही. सेटवर मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जाईल.

हेही वाचा: त्या काळात कपूर कुटुंबानेही फिरवली होती आईकडे पाठ; करीनाचा खुलासा