Challenge to amitabh bachchan! हे पाहून अमिताभ बच्चन मात्र अवाक झाले. kaun banega crorepati-children special. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

आणि अमिताभ बच्चन यांची बोलती झाली बंद!

sakal_logo
By
प्रणाली मोरे

वय वर्षे ७९ पण तरुणांना लाजवेल इतका दांडगा उत्साह असलेले अमिताभ बच्चन(Amitabh bachchan) आजही छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर सर्वत्र अॅक्टिव्ह आहेत. त्यांचे सिनेमे अजूनही बॉक्सऑफिस कलेक्शनची गणितं बदलतात. तर छोट्या पडद्यावर 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातूनं त्यांचं अस्खलित हिंदी ऐकणं,त्यांचं बोलणं,त्यांचं सेटवरचं वावरणं,स्पर्धकांशी संवाद साधणं,मजा-मस्ती करणं ह्या सगळ्याच गोष्टी नकळत आपलं लक्ष वेधून घेतात. आजही कैक वर्षांपूर्वीचा बिग बीं चा 'नौ बज गए क्या?' हा आवाज कौन बनेगा करोडपती लागलं की कानात घुमत राहतो. या सेटवरचे अनेक किस्से नेहमीच बिग बी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं शेअर करीत असतात.

हेही वाचा: ''मला शुभेच्छांपेक्षा सध्या कामाची गरज आहे''

नुकताच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोनी टि.व्ही ने शेअर केलाय. ज्यामध्ये त्यांना एका स्पर्धकाने चॅलेंज दिलंय. आणि हा स्पर्धक चक्कं एक लहान मुलगा आहे. या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना विचारलं की,'तुम्ही तुमची जीभ तुमच्या नाकाला लावू शकता का? कोप-याला-छातीला लावू शकता का?' आणि त्या लहान मुलाने ते स्वतः करून दाखविले. हे पाहून अमिताभ बच्चन मात्र अवाक झाले. बिग बी यांनी स्वतः ते चॅलेंज स्विकारत त्या मुलाप्रमाणे करून दाखवण्याचा प्रयत्न केला खरा पण काही केल्या ते जमेना. तिथे उपस्थित प्रेक्षकांनीही प्रयत्न करून पाहिले, पण सगळ्यांनीच त्या लहान मुलापुढे हात टेकले. अमिताभ यांनी तर 'तुझी जीभ खोटी आहे का?' असा सवालही केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

हेही वाचा: ''मलायका दिसते तशी नाही,चिडते तेव्हा..''

याचवेळी त्या लहान मुलाने आपल्यातील आणखी एक कला सर्वांसमोर आणली. कोरोनानं जे आपलं आयुष्य थांबवलंय त्यावर एक रॅप सॉंग गाऊन अद्वैत शर्मा नामक या मुलाने उपस्थितांची दाद मिळवली. त्याने अमिताभ यांना थेट काही प्रश्नही विचारले ज्यामुळे सेटवरचं वातावरण खूप मजा-मस्तीचं झालं. अद्वैत शर्मा नामक या मुलाने दस्तुखुद्द बिग बीं ची बोलती बंद केल्यानं सगळीकडेच याची मोठी चर्चा आहे.

loading image
go to top