Announcement karo mere saath,full life smile nahi utregi- Kartik Aaryan.कार्तिक आर्यनने थेट सोशल मीडियावर मागितले या निर्मातीकडे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

''मला शुभेच्छांपेक्षा सध्या कामाची गरज आहे''

कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत होता ते त्याच्याकडे असलेल्या सिनेमातून त्याला अचानक काढून टाकण्यात आल्याने. करण जोहरने त्याच्या 'दोस्ताना २' मधून कार्तिकचा पत्ता कट केला अनं हळूहळू करण जोहरची 'री' ओढत इतरही काही निर्मात्यांनी कार्तिकला आपापल्या सिनेमातनं बाहेरचा रस्ता दाखवला. पण कार्तिकने यावर कोणतंही विरोधी भाष्य करणं टाळलं. खरंतर या गोष्टींचा केवळ कार्तिकवर नाही तर त्याच्या कुटुंबावरही खोलवर परिणाम झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या.

कार्तिक आर्यन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो केवळ सेलिब्रिटींनी केलेल्या कमेंटवरच नाही तर अगदी सर्वसामान्य फॅन्सनी केलेल्या कमेंटवरही व्यक्त होतो. 'हॅप्पी गो लकी' अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. नुकताच कार्तिकने त्याचा ३१वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केवळ कार्तिकचे फॅन्स नाहीत तर अनेक बॉलीवूडकरांनीही कार्तिकला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. 'पती,पत्नी और वो' या कार्तिकच्या सिनेमात त्याच्या पत्नीची भूमिका केलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर,निर्माती-दिग्दर्शिका फराह खान,निर्माती एकता कपूर अशा अनेकांनी कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आणि कार्तिकने नेहमीप्रमाणे मजामस्करी करीत या कमेंट्सना उत्तर देताना प्रत्येकाला खास प्रतिक्रिया दिलीय.

farah khan

farah khan

कार्तिकला त्याची सहकलाकार भूमी पेडणेकरने शुभेच्छा देताना लिहिलं होतं की,"Happy birthday @kartikaaryan. May this year be full of love & light." पण भूमीच्या या शुभेच्छेच्या मेसेजवर कार्तिकनं तिला चिडवत म्हटलं की,"Wah!Diwali wala copy paste kar rahi hai?kuch aur better likho patniji!'' तेव्हा भूमीने पुन्हा कार्तिकला मेसेज करीत लिहिले की,''हॅप्पी बर्थ डे द मोस्ट धमाकेदार को-स्टार/इन्सान. आपके सेन्स ऑफ ह्युमर और हसी हमेशा बरकरार रहे. इनशॉर्ट दुधो,नहाओ,पुतो,फलो.'' निर्माती-दिग्दर्शक फराह खाननेही कार्तिकसोबतचा सेल्फी शेअर करीत कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ''keep Smiling....It drives people crazy." असे लिहिले आहे. तेव्हा मात्र कार्तिकने त्याच्या चाणाक्ष बुद्धीने जो काही रिप्लाय दिलाय तो लाजवाब म्हणावा लागेल. कार्तिक म्हणालाय की,''अनाऊंसमेंट करो मेरे साथ. फूल लाइफ स्माइल नही उतरेगी.''

हेही वाचा: सलमान म्हणाला,''असेल हिंमत तर करून दाखवा''

आता कार्तिकने सोशल मीडियावर फराहला असे बोलून तिला गोत्यात आणले आहे. नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कार्तिकच्या 'धमाका' सिनेमाला चांगले रीव्ह्यू मिळत आहेत. तर आगामी भूलभूलैय्या २,शेहजादा,फ्रेडी या सिनेमातही कार्तिक दिसणार आहे.

loading image
go to top