Karisma recalled an incident about malaika मलायका खूप सिरीयस होते तेव्हा,मी पाहिलंय की....kareena's wedding memory | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika  Arora

''मलायका दिसते तशी नाही,चिडते तेव्हा..''

sakal_logo
By
प्रणाली मोरे

मलायका अरोराला(Malaika Arora) पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोचायला आता काहीच वर्ष राहिली आहेत. पण तिच्या बोल्ड आणि हॉट अदांनी तिला कधीच वयानं मोठं होऊ दिलं नाही. ती स्वतःला ज्या पद्धतीनं कॅरी करते ते पहाणं केवळ मोहक असतं. अरबाज खानची पत्नी आणि खान कुटुंबाची सून असूनही तिनं आपल्या नृत्याच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अरबाजपासून वेगळं होताना आणि आपल्यापेक्षा वयाने अधिक लहान असणा-या अर्जुन कपूर(Arjun Kapoor) सोबत असलेल्या नात्याचा स्विकार करताना तिनं कोणाचाही विचार नं करता बिनधास्तपणे आपली मतं मांडली.

मलायका अरोराने जरी लग्न करून बॉलीवूडमधल्या मोठ्या कुटुंबाशी नातं जोडलं होतं तरी इंडस्ट्रीतल्या 'खान'पेक्षाही मोठं समजल्या जाणा-या 'कपूर' खानदान तर तिच्यासाठी तिच्या घरापेक्षा कमी नाही. कारण करिष्मा(Karisma Kapoor) आणि करिना (Kareena Kapoor-Khan)मलायकाच्या खास मैत्रिणी आहेत. एकमेकांच्या सुख-दुःखात यांना नेहमीच एकत्र पाहिलं गेलंय. मलायका,तिची बहिण अमृता,करिष्मा,करिना या चौघी नेहमीच एकत्र पार्टी करताना किंवा हॉलिडे एन्जॉय करताना आपल्याला त्यांनी शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडिओमधनं दिसत असतात. एकमेकांच्या घरच्या सोहळ्यांमध्ये तर या मैत्रिणी अगदी धम्माल करताना दिसतात. नुकत्याच सोनी टी.व्ही वरील इंडियाज् बेस्ट डान्सर २ च्या एका भागात करिष्मा पाहुणी म्हणून आली होती. तिच्यासोबत सुनिल शेट्टी ही आला होता. या भागात सुनिल शेट्टी आणि करिष्मा कपूरच्या गाण्यांवर स्पर्धकांनी नृत्य केलं. पण सगळयात लक्षणीय आणि प्रेक्षणीय ठरलं ते करिष्मा-मलायका ने केलेले नृत्य.

करिष्माने मलायकाच्या 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर ठेका धरला तर मलायका करिष्माच्या 'इश्क है सुहाना' या गाण्यावर थिरकली. त्यावेळी करिष्माने करिनाच्या लग्नातील मलायकाची एक आठवण सांगितली. ती म्हणाली,"डान्स करताना जर आपण थोडीशी देखील चूक केली,आणि तो डान्स मलायकानं बसवला असेल तर मग आपली काही खैर नाही. डान्स करताना ती खूप सिरीयसली तो करते,तिला मजा-मस्ती त्यावेळी चालत नाही. तिचा राग तेव्हा पाहण्यासारखा असतो.''

यानिमित्ताने करिष्माने पुन्हा करिनाच्या लग्नातल्या आठवणी जाग्या केल्या. करिना कपूरने १६ऑक्टोबर २०१२ मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्नगाठ बांधली होती. करिनाला आता दोन मुले झाली असून तिच्या मोठ्या मुलाचे नाव 'तैमूर' तर लहान मुलाचे नाव 'जहांगिर' असे आहे.

loading image
go to top