चंद्रमुखीचे घुंगरू खणखणले.. दोन दिवसात अडीच कोटींची कमाई |chandramukhi marathi movie box office collection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandramukhi marathi movie box office collection

चंद्रमुखीचे घुंगरू खणखणले.. दोन दिवसात अडीच कोटींची कमाई

मराठी चित्रपट विश्वात आजवर कधीही झाले नाही असे प्रमोशन प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' चित्रपटाने केले. आघाडी गावकुसापासून ते विमानतळापर्यंत सर्व ठिकाणी चित्रपट पोहोचला. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी अथक परिश्रम केले. या चित्रपटातील लावण्या तर सध्या घराघरात वाजत आहेत. त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

हेही वाचा: शरद पोंक्षे : 'वा राजसाहेब वा, आम्ही भारतीय आज..'

शुक्रवारी २९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये दमदार प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बऱ्यापैकी शोज हाऊसफुल जात असून आता पहिल्या दोन दिवसांचा कमाईचा आकडा समोर आला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच ‘चंद्रमुखी’ची (Chandramukhi) कमाई कोट्यवधींच्या घरात झाली आहे. चित्रपटात चंद्राची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. चंद्रमुखी’ने पहिल्या दिवशी 1.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अमृता खानविलकर 'चंद्रा' आणि आदिनाथ कोठारे 'दौलतराव' या प्रमुख भूमिकेत आहेत.

दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चंद्रमुखीने 2.53 कोटींची कमाई केली. याबाबत कलाकारांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून माहिती दिली आहे. ध्येय धुरंधर राजकारणी आणि तमाशा कलावंत चंद्रा यांच्या प्रेमाची ही गाथा आहे.

Web Title: Chandramukhi Marathi Movie Box Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top