शरद पोंक्षे : 'वा राजसाहेब वा, आम्ही भारतीय आज..' sharad ponkshe tweet on raj thackeray speech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Ponkshe Tweet on Raj Thackeray

शरद पोंक्षे : 'वा राजसाहेब वा, आम्ही भारतीय आज..'

अभिनयासोबतच आपल्या विचारांनी हिंदूंना संबोधित करणारे, सावरकरांची विचारधारा जपणारे अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या विधानाने कायमच चर्चेत असतात. त्यांची विचारधारा आणि राजकीय मते स्पष्ट असल्याने त्यांच्याविषयी अनेक मत मतांतरे आहेत. 'हे राम,नथुराम' हे त्यांचे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. परंतु गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक असल्याची टीका अनेकांकडून झाली. गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे समर्थन करणारे हे नाटक असल्याने अनेकांनी या नाटकावर बंदी आणण्याची मागणी केली. परंतु त्यावेळी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पोंक्षे यांना पाठींबा दिला. सध्या हे नाटक पोंक्षे यांनी थांबवले असले तरी व्याख्याने आणि चर्चासत्रे यातून ते सावरकरांचे विचार जनमानसात पोहोचवत आहेत. हेच शरद पोंक्षे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. (Sharad Ponkshe Tweet on Raj Thackeray)

हेही वाचा: साराला करायचाय 'कुछ कुछ होता है' चा रिमेक.. चाहते म्हणाले, कृपया..

रविवारी महाराष्ट्र दिनादिवशी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणावर शरद पोंक्षेंनी (sharad ponkshe) त्यावर प्रतिक्रिया देत एक ट्वीट केले आहे. “व्वा राजसाहेब व्वा .आम्ही भारतीय आज सुखावलो.बऱ्याच काळाने एक जबरदस्त विचार,विशेषतः मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे आमच्या मनातले विचार मांडलेत धन्यवाद.” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..

दरम्यान, या आधी राज ठाकरेंच्या ठाण्यात झालेल्या भाषणावर देखील शरद पोंक्षेंनी प्रतिक्रिया दिली होती. “आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब.”, अशी पोस्ट त्यांनी केली होती.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरल्याने गेल्या काही दिवसापासून ते चर्चेत आहेत. हिंतुत्ववादी समाजकडून त्यांचे कौतुक होत आहे तर विरोधी पक्षाने त्यांना धारेवर धरले आहे. पण राज ठाकरे यांनी हिंदू समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेचे शरद पोंक्षे यांच्याकडून मात्र कौतुक होत आहे.

Web Title: Sharad Ponkshe Tweet On Raj Thackeray Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top