आली रे आली चंद्रमुखी, टीझरची सोशल मीडियावर हवा

Chandramukhi
ChandramukhiInstagram

'कच्चा लिंबू' आणि 'हिरकणी' सारखे लोकप्रिय चित्रपट देणारा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'चंद्रमुखी'च्या तयारीत आहे. गेल्या वर्षी 'चंद्रमुखी' (Chandramukhi) च्या टीझरने इंडस्ट्रीत चांगलीच खळबळ उडवून दिली होती. आता निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज केला आहे.

एक मिनिट-सहा सेकंदाची क्लिप सुंदरपणे सजवलेल्या स्टेजवर ढोलच्या एका चित्तवेधक तालाने सुरू होते. ही एक महत्त्वाकांक्षी चतुर राजकारणी आणि तमाशातील एका मोहक सुंदर मुलीची प्रेमकथा आहे. 'चंद्रमुखी' हा विश्वासपाटील लिखित याच नावाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे रूपांतर आहे, जो यावर्षी सिनेसृष्टीत रिलीज होणार आहे.

या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय–अतुल (Ajay-Atul) या दमदार जोडीने ‘चंद्रमुखी’ला संगीत दिले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रमुखी’ आणि इतर कलाकारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com