Chandrayaan 3: 'चांद्रयानापुर्वी चंद्रावर बसलेला पहिला भारतीय...' महागुरुंची भन्नाट पोस्ट

Chandrayaan 3  Sachin Pilgaonkar  post
Chandrayaan 3 Sachin Pilgaonkar post Esakal

Sachin Pilgaonkar post: भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यामुळे इस्रोचं संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश म्हणून आता भारताची ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या चांद्रयान 3 या मोहिमेच्या चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यामुळे संपूर्ण देश उत्साहात आहे.

Chandrayaan 3  Sachin Pilgaonkar  post
Urvashi Rautela: उर्वशी अन् क्रिकेटचं नातचं जूनं! 'वर्ल्ड कप 2023'च्या ट्रॉफीसोबत फोटो शेयर करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत या अद्भुत कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केले. अशातच आता सचिन पिळगावकर यांची चांद्रयान – ३ बद्दल केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या ऑल टाईम हिट सिनेमा ‘अशी ही बनवाबनवी’ यातील एक खास क्षणाचा फोटो शेयर केला आहे. सचिन पिळगांवकर यांनी शेयर केलेल्या फोटोत लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहेत, ज्यांनी या सिनेमात पार्वती बाईची भुमिका साकारली होती. पार्वतीच्या डोहाळे जेवणादरम्यानच्या सीनवेळी हा फोटो काढण्यात आला होता. ज्यात ते चंद्रावर बसले आहेत.

Chandrayaan 3  Sachin Pilgaonkar  post
Chandrayaan-3 Movie Announced: चांद्रयान-३ वर चित्रपट येणार! मिशन मंगलच्या दिग्दर्शकाने केली घोषणा

हा फोटो सोशल मीडियावर शेयर करतांना सचिन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “चंद्रावर बसणारा पहिला भारतीय.”

सध्या सचिन पिळगावकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल झाली आहे. नेटकरी या पोस्टला भन्नाट कमेंट करत आहेत.

Chandrayaan 3  Sachin Pilgaonkar  post
Seema Deo: 'चतुरस्त्र अभिनेत्री हरपली..', अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

अनेकांना या पोस्टमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली आहे. तर काहींना सिनेमा आठवला आहे. त्यातच सचिन यांनी इस्रो आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिनेमाची तुलना केल्यांमुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं आहे.

एकानं लिहिलयं , "एक पुनरावर्ती आनंद देणारा सदाबहार चित्रपट!" तर दुसऱ्याने लिहिलयं, "अविस्मरणीय अभिनेता... लक्ष्मीकांत जी".

तर काहींनी सिनेमाबाबत लिहिलयं की, "अजरामर कलाकृती म्हणजे.. बनवाबनवी.. सलग 365 दिवस पाहिला तरी कंटाळा येणार नाही आणि ज्याला येईल तो मराठी रसिक नाही", "पार्वती धनंजय माने पहिली मराठी महिला जी चंद्रावर पोहचली होती".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com