Chandrayaan 3: चांद्रयान-3 वर मराठमोळ्या रितेश अन् वहिनींची खास प्रतिक्रिया, आपल्याला...

Chandrayaan 3 Landing Marathi News : आज बुधवारी संध्याकाळी सहा वाजता भारताच चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागाला लँड होणार आहे.
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh Esakal
Updated on

Riteish Deshmukh Comment On Chandrayaan 3: भारतासाठी आजचा दिवस खास आहे. भारताच्या इस्त्रोनं मोठी ऐतिहासिक कामगिरी करुन साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आज बुधवारी संध्याकाळी सहा वाजता भारताच चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागाला लँड होणार आहे. आज भारताच्याच नव्हे तर सगळ्या जगाच्या नजरा चांद्रयान-3 वर खिळल्या आहेत.

भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या या क्षणाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलीवूडमधील स्टार्सही खूप उत्साहित आहेत. अनुपम खेर, करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी 'चांद्रयान 3'बद्दल आनंद व्यक्त केला आहे.

तर त्यातच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया हिने देखील चांद्रयान 3 साठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं सागंतिलं.


(Chandryaan 3 Riteish Deshmukh And Genelia D'Souza Tweet Congratulates To ISRO)

Riteish Deshmukh
Rakhi Sawant: राखी सावंतच्या अडचणी वाढणार! जिवलग मैत्रिणीनेच दाखल केली पोलिसात तक्रार

रितेश म्हणतो की, 'आज चांद्रयान 3 ची लँडिंग आहे.आपल्या भारतीयांसाठी ही खुप अभिमानाची बाब आहे. आज मी सकाळ पासून खुप आनंदित आहे. त्यामुळे इस्रोचा टिशर्ट घालून सर्वत्र फिरत आहे. आपण खुप गर्वित भारतीय आहोत जे आपल्या देशाला सपोर्ट करत आहेत.'

याचबरोबर रितेशने एक ट्विट देखील शेयर केले आहे ज्यात त्याने इस्रोच्या टी-शर्टमधील स्वतःचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आपला उत्साह व्यक्त करताना त्यांने लिहिले, "हा #Chandrayaan3 लँडिंग डे 6.04 आहे."

Riteish Deshmukh
Amitabh Bachchan On Chandrayaan 3 : 'उस चांद के मिट्टी पर हमारे....!' अमिताभ यांची कविता वाचून येईल डोळ्यात पाणी!

चांद्रयान 3 बद्दल बोलताना करीना कपूर म्हणाली होती की, 'ती याला सपोर्ट करत आहे आणि ती तिच्या मुलांसोबत हा क्षण पाहणार आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची वेळ आहे. तो अभिमान आपण अनुभवू शकतो. भारतीय म्हणून आपण सर्वजण यावेळेची वाट पाहत आहोत.'

Riteish Deshmukh
Chandrayaan 3: चांद्रयान-3 वर मराठमोळ्या रितेश अन् वहिनींची खास प्रतिक्रिया, आपल्याला...

चांद्रयान 3 च्या लँडिंगवर अभिषेक बच्चन म्हणाला, 'मला याचा खूप अभिमान वाटत आहे. आपला स्पेस प्रोग्राम हा चंद्रावर पोहोचला आहे.' तो लाईव्ह लँडिंग पाहणार आहेत.'

तर गायिका शिबानी कश्यपने इस्रो टीमला शुभेच्छा दिल्यात. शिबानीने गिटारसह एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेले 'दिल है छोटा सा, छोटी सी आशा...' हे गाणे वैज्ञानिकांना समर्पित केलयं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com