'त्या संध्याकाळी असं काय घडलं की घटस्फोटाचा निर्णयच बदलला..', चारु असोपा अखेर बोलली

बिग बॉसमध्ये जाण्यासाठी घटस्फोटाचा ड्रामा केला होता असं म्हणणाऱ्यांना चारु असोपानं घटस्फोटाचा निर्णय बदलण्यामागचं कारण आपल्या ब्लॉगमधून सांगितलं आहे.
Charu Asopa shres How And Why she saved her marriage with sushmita sen's brother rajeev sen
Charu Asopa shres How And Why she saved her marriage with sushmita sen's brother rajeev senGoogle

Charu Asopa On Her Divorce:सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टी.व्ही अभिनेत्री चारु असोपा यांचं वैवाहिक आयुष्य गेल्या काही दिवसांपूर्वी भलतंच चर्चेत होतं ते त्यांनी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे. पण तिथंच ही चर्चा थांबली नाही उलट अधिक जोमानं सुरू झाली जेव्हा अचानक या दोघांनी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्यानंतर आपला घटस्फोटाचा निर्णय बदलला. अर्थात हे असं सगळं घडल्यानंतर लोक थोडीच त्यांना ट्रोल केल्याशिवाय सोडतायत. काही म्हणाले ,'हे सगळं पब्लिसिटी स्टंट होतं,तर काही लोक याला आता बिग बॉस जाण्याआधीचा ड्रामा म्हणतायत'. त्यामुळे आता चारु असोपानं मोकळेपणानं आपल्या नात्यावर संवाद साधला आहे.(Charu Asopa shres How And Why she saved her marriage with sushmita sen's brother rajeev sen)

Charu Asopa shres How And Why she saved her marriage with sushmita sen's brother rajeev sen
KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐका

आपल्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये चारु असोपनं राजीव सेनसोबतच्या आपल्या नात्यावर भाष्य केलं आहे. चारुने आपल्या चाहत्यांचे आभार मानत म्हटलं आहे की- ''तुम्ही आमच्या पूर्ण प्रवासात सोबत राहिला आहात,तुम्ही सगळं पाहिलं आहे''. ती म्हणाली,''तुमच्यापैकी काही लोक ज्यांनी मला फॉलो थोडं उशिरा केलं आहे त्यांना काही गोष्टी आधीच्या माहिती नाहीत, त्यामुळे ते माहीत असलेल्या थोड्या माहितीच्या आधारावरच माझी पारख करताना दिसतायत. तुमच्यापैकी काही लोक माझ्यावर नाराज आहेत,ज्यांना वाटतं की बिग बॉस साठी हा सगळा पब्लिसिटी स्टंट केला होता. मला वाटतं की माझ्यात आणि राजीवमध्ये गोष्टी बिघडल्या होत्या,आणि आम्ही खरंच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता''.

''मी तुम्हा सगळ्यांसोबत गोष्टी शेअर केल्या होत्या. मी जेव्हा भीलवाडा मध्ये होती तेव्हा मी म्हणाले होते की,मी मुंबईला परत येऊन माझा नवीन प्रवास सुरु करणार आहे. सगळं प्लॅन केलं होतं, पण म्हणतात नं देवानं आपल्यासाठी जे आधीच नियोजित करुन ठेवलं आहे त्यापुढे आपलं काहीच चालत नाही. मला वाटतं त्यानं माझ्यासाठी वेगळा विचार करुन ठेवला आहे,जे आमच्यासाठी सगळं चागलंच घडवून आणणार आहे''.

चारु म्हणाली,''जेव्हा मी भीलवाडा इथे होती आणि मुंबईला येण्यासाठी फ्लाईटमध्ये बसली होती तेव्हा बाप्पांचे आगम होणार होते. ३१ ऑगस्टला बाप्पा येणार होते आणि ३० तारखेला आम्ही दोघं घटस्फोटाचे पेपर साइन करण्यासाठी जाणार होतो, २९ ला मी फ्लाइटमध्ये बसली होती. मी तेव्हा मनात म्हटलं,बाप्पा मी तुम्हाला माझ्या घरी आणणार आहे,तुम्हाला जे माझ्याबाबतीत योग्य वाटतं तसं करा. आणि मी मुंबईत २९ च्या संध्याकाळी पोहोचले आणि ३० ऑगस्ट सकाळी आम्हाला फॅमिली कोर्टात जायचं होतं. तेव्हा असंच बसल्या-बसल्या मी आणि राजीव बोलू लागलो. असं म्हणतात गोष्टी बोलल्यानं आयुष्य सोपं होऊन जातं. बोलता-बोलता आमच्यातील बऱ्याच गैरसमजुती दूर झाल्या,कदाचित बाप्पांच्या मनात हेच होतं. आम्ही जियानासाठी एकमेकांना आणखी एक संधी द्यावी असं वाटलं त्याक्षणी आम्हाला''.

Charu Asopa shres How And Why she saved her marriage with sushmita sen's brother rajeev sen
कहर! लॉलीपॉप खात करिश्माने दिला नॉटी लूक

चारु पुढे म्हणाली,''नातं तोडणं खूप सोपं असतं,आम्ही दोघांनी बसून निर्णय घेतला की आपण एकमेकांना एक संधी द्यायला हवी,यात काहीच वाईट नाहीय. बस्स तसं घडलं. यामध्ये मला नाही वाटत काही पब्लिसिटी स्टंट आहे. कारण मला वाटतं की हा सगळा एक चमत्कार होता. सगळं नियोजित असेल कदाचित. मी खरंतर एका नवीन घराचं टोकनही दिलं होतं. मला त्या घरी २ सप्टेंबरला शिफ्ट व्हायचं होतं. सगळं फर्नीचरही आलं होतं''.

''या सगळ्यानंतर जे काही घडलं ते सगळं सरप्राइसिंग होतं माझ्यासाठी. आणि मला माहितीय हे सगळं बाप्पाने केलं. मी आजपर्यंत त्याच्याकडे जे मागितलं ते त्यानं मला सगळं दिलं आहे. त्यानंतर आम्ही ३१ ऑगस्टला बाप्पाला घरी आणलं,गणेशोत्सव एकत्र मिळून साजरा केला. बस्स हे असं सगळं घडलं आणि मला वाटलं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करायला हवं''.

Charu Asopa shres How And Why she saved her marriage with sushmita sen's brother rajeev sen
सई म्हणजे निव्वळ हॉट चॉकलेट...

राजीव सेन-चारु असोपा यांच्यातील घटस्फोट प्रकरणाविषयी इथं थोडक्यात सांगतो की,या दोघांचे लग्न २०१९ साली गोव्यात झाले. लग्नानंतर लगेचच यांच्यात धुसफूस सुरू झाली होती पण तरिही २०२१ साली यांनी एका मुलीला जन्म दिला. आणि बस्स तिच्या जन्मानंतर सगळं ठीक सुरू आहे असं वाटत असतानाच अचानक ७ महिन्यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चारुने राजीव सेन सोबतचे सगळे फोटो,पोस्ट डिलीट केले होते. चारु असोपाने राजीव सेनवर आरोपही लावले होते की जेव्हा कोणतीही अडचण येते,तिचा पती लगेच घर सोडून जातो. त्यामुळे ती अडचण कधीच सुटत नाही,उलट वाढते,असं त्या आरोपातसती म्हणाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com