esakal | ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक

ऑनलाइन शॉपिंगमध्ये शाहिदच्या पत्नीची फसवणूक

sakal_logo
By
शरयू काकडे

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत फिल्मी दुनियेपासून दूर असूनही नेहमी चर्चेत असते. मीराची फॅन फॉलोईंग कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर मीरा खूप पॉप्युलर आहे. सध्या मीराने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाल्याची माहिती दिली आहे.

मीराने ऑनलाईनद्वारे मोबाइल फोन कव्हर मागवला होता. पण यात तिची फसवणूक झाली आहे. तिने या फोन कव्हरचा फोटो शेअर केला आहे. मीराने सांगितले की, ''वर्कआऊट करताना तिला उपयोगी पडेल अशी मोबाईलसाठी एक स्लिंग केस हवी होती. एक जाहिरात पाहून मी ऑनलाइनद्वारे हा कव्हर खरेदी केला. मात्र कव्हर जसा चित्रात दाखविला तसा अजिबात नव्हता. मला स्लिंग कव्हरची गरज होती, ज्यामुळे बॅग न घेता मी कुठेही जाऊ शकते.'' या घटनेला काही वर्ष झाल्याचेही तिने यावेळी सांगितले.

हेही वाचा: 'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरल

'ही पोरी कोणाची?'; मराठी कपलचा सुपरहिट डान्स व्हिडीओ व्हायरलखरेदी केल्यावर डिफेक्टिव्ह निघाला कव्हर

मीराने एक फोटो शेअर करत सांगितले की, ''ऑनलाईन फोन खरेदी करणे असुरक्षित आहे. दोन्ही कोपऱ्यांवर लावेलल्या कुशन्स सारखी छोटी कुशन्स सारखी एक वस्तू देखील पडली आहे.'' यापुढे मीराने उपहासात्मकपणे लिहिते की, चालताना हे उच्च क्वालिटीचे स्टिकर्स माझ्या फोनला पडण्यापासून वाचवतील''

हेही वाचा: करीना-सैफच्या दुसऱ्या मुलाचं ठरलं 'हे' नाव?

मीराने शाहिद कपूरसोबत केला होता फोटो शेअर

अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलेले बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत . या दोघांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांना झैन आणि मिशा अशी दोन मुलं आहेत. ही जोडी बऱ्याच वेळा चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे अनेक वेळा सोशल मीडियावर या जोडीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. त्यातच मीराच सोशल मीडियावर शाहिदपेक्षा जास्त वावर असल्याचं पाहायला मिळतं. मीराने नुकताच शाहिद कपूर सोबत एक फोटो पोस्ट केला होता. ''शब्दात सांगता येणार नाही त्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते. आनंदी 6 वर्ष, माझं प्रेम, माझं आयुष्य'' असे आयूष्य'' असे कॅप्शनही मीराने फोटोला दिले आहे.

loading image