esakal | घाबरणार नसाल तर 'छोरी'चा लूक एकदा पाहाचं! : 'लपाछपीचा' रिमेक
sakal

बोलून बातमी शोधा

घाबरणार नसाल तर 'छोरी'चा लूक एकदा पाहाचं! : 'लपाछपीचा' रिमेक

घाबरणार नसाल तर 'छोरी'चा लूक एकदा पाहाचं! : 'लपाछपीचा' रिमेक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

लॉकडाऊननंतर मोठ्या प्रमाणात मनोरंजन क्षेत्रातील गती वाढताना दिसत आहे. नवनवीन मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील अनेक वेबमालिका आणि चित्रपट प्रदर्शित झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे छोरी या हॉरर मुव्हीची एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. सोशल मीडियारवर या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला आहे. अमेझॉन प्राईमनं त्यांच्या हॉरर मुव्हीला प्रेक्षकांपुढे सादर केलं आहे. ही झलक थेट ‘भूतिया’ नसली तरीही पाहणाऱ्याचा थरकाप उडवणारी आहे. तिचे सादरीकरण भीतीदायक, पाठीच्या कण्यातून हादरवून टाकणारी सणक जाईल असे आहे.

जर तुम्हाला अंगावर काटा आणणारा अनुभव घ्यायची इच्छा असेल, तर मग हा सिनेमा तुमच्यासाठी असणार आहे. अमेझॉन ओरीजनल मुव्ही 'छोरी' प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात धडकी भरवणाऱ्या अनुभवासाठी तयार राहा. छोरी हा एक भयपट असून त्याचे दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे, तर भूषण कुमार, क्रिशन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा हे निर्माते आहेत. मराठी फिल्म लपाछपीचा हा रिमेक असून त्यात मुख्य भूमिकेत नुसरत भरूचा दिसेल. तिच्यासोबत मिता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज झळकणार आहेत.

एबंडेंशिया एंटरटेनमेंटच्या ‘साईक’ (हॉरर आणि पॅरानॉर्मल जॉनरवर केंद्रित विभाग) आणि लॉस एंजलिस येथील क्रिप्ट टीव्ही पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. क्रिप्ट टीव्हीने द लुक-सी, द बीर्च, सनी फॅमिली कल्ट आणि द थिंग इन द अपार्टमेंट अशा नवीन भय-पटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

loading image
go to top