Children's day : मराठी कलाकारांनी शेअर केले लहानपणीचे 'खास' फोटो !

Children's day : Marathi celebs shared their pictures
Children's day : Marathi celebs shared their pictures

मुंबई : आज आहे 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिवस. लहान मुलांचा खास दिवस. त्यामुळे आपल्या लहानपणीचे मेमरीज शेअर करण्यापासून मोठ्या लोकांनाही आवर घालता येत नाही. यामध्ये मराठी कलाकारही कुठे मागे नाहीत आणि आजच्या खासदिनी या कलाकारांनी सोशल मीडियावर आपले लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. सध्या नेटकऱ्यांमध्येही याची  चर्चा सुरु आहे. 

मराठी कलाकारांनी शेअर लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. नृत्य आणि आपल्या मोहक अदांनी सर्वांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिने बालपणीच्या आठवणी शेअर करताना घागरा-चोलीतला क्युट फोटो शेअर केला आहे आणि चाह्त्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aren't you thankful that your childhood happened before technology took over... Happy Children's Day

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या प्रसिद्ध मालिकेने कमी काळातच प्रेक्षकांच्या मनात घर केले. मालिकेमधील 'पाठक बाई' ची पसंतीही तितकीच आहे. पाठक बाई म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर हीने इन्स्टाग्रामवर  तिचा लहानपणीचा गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. छोट्या अक्षयाला या फोटोमध्ये ओळखणे जवळपास कठीणच झाले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy children’s day ! 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

मराठी मालिकांमधील मजेशीर, अनोखी आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. या मालिकेची प्रसिद्धी सर्वाधिक आहे आणि त्यामधील पात्रांचीही तितकीच पसंती आहे. या मालिकेतला 'गॅरी' म्हणजे अभिनेता अभिजीत खांडेकर यानेही त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. लहानपणीच्या अभिजीतचा गंभीर आणि तरीही पोस देणारा लुक क्युट आहे. छोट्या गॅरीचा हा फोटो एकदा पाहाच !

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Inner child is still #ageless #childrensday

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

कोणत्याही मालिकेने कमी वेळेत प्रेक्षकांची मने जिंकणे हे त्या मालिकेचे यशच म्हणावं लागेल. अशीच काही दिवसांपूर्वीच आलेली आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजे, 'मिसेस मुख्यमंत्री'. समर आणि सुमीच्या जोडीला अख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. या मालिकेतली सुमी म्हणजेच अमृता धोंगडे हीनेही तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला. कुरळे केस, ओठावर लिपस्टीक आणि तरीही पोस देणारी लहानगी अमृता यामध्ये गोंडस दिसत आहे. कॅप्शनमधून तिने चाहत्यांना बालदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy children's day 

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

मराठी सिनेसृष्टीतली फॅशन सेंसेशन आणि बोल्ड अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने बालदिनानिमित्त लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ताई, भाऊ आणि लाडक्या आजीसोबतचा फोटो शेअर करत 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' असं कॅप्शन तिने दिलं आहे. प्राजक्ता सध्या ' महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्य़क्रमाचं सुत्रसंचालन करत आहे. तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे ती सतत चर्चेत असते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com