चिन्मय होता भाग्यश्रीचा क्रश

टीम ई सकाळ
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई : सध्या घाडगे आणि सून मधील अमृता घाडगे म्हणजेच भाग्यश्री लिमये प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. तिच्या मालिकेमधील पात्रामुळे ती आताच्या काळातील मुलींचे प्रतिनिधीत्व करते आहे असा चाहत्यांचा प्रतिसाद तिला मिळतो आहे. या प्रेक्षकांच्या पाठींब्यामुळे आणि प्रेमामुळे ती खूपच खुश आहे आणि तिने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत. तुमच्या लाडक्या भाग्यश्रीला प्रेमाने सोनू असे म्हणतात, मग ते सेटवर, घरी असो तिचे मित्र मैत्रीण असो. तसेच तिला फोटो काढायला देखील खुपा  आवडते आणि ती सोशल मिडियावर देखील बरीच active आहे, खासकरून Insta, FB.

भाग्यश्री मुळची सोलापूरची असून तिचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्री आणि तिच्या मैत्रिणीचे चिन्मय उदगीरकर क्रश होते, त्यांना तो खूपच आवडायचा. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “जेंव्हा मला घाडगे & सून मालिका मिळाली तेंव्हा मी खूपच खुश झाले, आणि जेंव्हा मला कळाले किमाझ्यासोबत चिन्मय असणार आहे ते कळल्यावर मला आनंद झाला. मला माझ्या मैत्रिणी अजूनही चिडवतात कि, तुला त्याच्या बरोबर काम करायला मिळाले. मी अस म्हणेन, चिन्मय अतिशय चांगला अभिनेता आहे, आणि त्याचबरोबर माझा एखादा सीन चांगला झाला कि तो मला प्रोत्साहनदेखील देतो”. घाडगे अॅंड सूनच्या सेटवर सगळेच कलाकार खूप कामासोबत मज्जा, मस्ती देखील करतात. संध्याकाळ झाली कि सेटवर माई म्हणजेच आपल्या लाडक्या सुकन्या ताईचा डब्बा उघडतो म्हणजे अजूनच धम्माल.

Web Title: chinmay crush of bhagyashri esakal news