jeev zala yedapisa
jeev zala yedapisa

मालिका निरोप घेताना चिन्मय मांडलेकर भावूक; 'माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची..'

सिद्धी आणि शिवा या दोन धगधगत्या निखाऱ्यांच्या नातेसंबंधाची रांगडी प्रेमकथा 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पार केला आणि आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची कथा चिन्मय मांडलेकरने लिहिली. मालिका संपत असताना चिन्मयने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. माझ्या काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका, अशा शब्दांत चिन्मयने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेची शूटिंग सांगलीमध्ये व्हायची. नवोदित विदुला चौघुले सिद्धीची भूमिका आणि अशोक फळदेसाई शिवाची भूमिका साकारत होता. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, चिन्मयी सुमितदेखील मुख्य भूमिकेत होते.

'५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन जीव झाला येडापिसाचा प्रवास आज थांबतो आहे. माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका. पुराशी, कोविडशी लढली. कलेकलेनं वाढली. ५ भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास ‍थांबेल. कधी थांबणार? पेक्षा क‍ा थांबलात? हा प्रश्न कधीही गोड वाटतो. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार. शिवा, सिद्धी, जलवा, सोनी, आत्याबाई, सरकार आणि संपूर्ण रुद्रायतच्या जगावर प्रेम करणार्‍या रसिकांचे आभार', असं चिन्मयने लिहिलं. 

रुद्रायत या गावामध्ये मध्यमवर्ग कुटुंबामध्ये वाढलेली सिद्धी गोकर्ण ही स्वाभिमानी, तत्वनिष्ठ आणि जगाच्या चांगुलपणावर खूप विश्वास असलेली मुलगी आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवा अत्यंत धडाडीचा, शीघ्रकोपी, बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा असा रांगडा गडी आहे. सिद्धी आणि शिवा दोघेही परस्परविरोधी माणसं कुठल्या परिस्थितीत लग्नबंधनात अडकतात? एकमेकांबद्दल असं कुठलं सत्य आहे जे दोघांना माहिती नाही? तिरस्काराचा भडका प्रेमाची ऊब बनून सिद्धी-शिवाला कसं एकत्र आणलं, हा प्रवास प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळाला. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com