साजीद खानवर मॉडेलने केले आरोप, १७ वर्षांची असताना केलं होतं लैंगिक शोषण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 11 September 2020

एका मॉडेल पाउलाने साजीदवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट केली आहे.   

मुंबई- २०१८ या वर्षात बॉलीवूडमध्ये मीटू मुवमेंटने जोर पकडला होता. या दरम्यान दिग्दर्शक साजीद खानवर एका पत्रकारासोबत अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींनी शोषण केल्याचा आरोप लावला होता. याचा परिणाम म्हणून 'हाऊसफुल्ल ४'च्या दिग्दर्शनाच्या पदावरुन साजीदला काढून टाकण्यात आलं होतं. साजीद सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसून येतो. आता तर एका मॉडेल पाउलाने साजीदवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट केली आहे.   

हे ही वाचा: 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'बॉन्ड' फेम अभिनेत्री डेम डायना रिग यांचं निधन, भारतात घालवलं होतं लहानपण  

पाउलाने म्हटलंय की ती मीटू मुवमेंट दरम्यान गप्प होती कारण इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि कुटुंबासाठी तिला काम करणं गरजेचं होतं. आता तिचे आई-वडिल तिच्यासोबत नाहियेत त्यामुळे आताच ती दिग्दर्शकाविरुद्ध बोलू शकते. पाउलाचा आरोप आहे की १७ वर्षांची असताना तिच्यासोबत शोषण झालं होतं. 

पाउलाने लिहिलंय, 'जेव्हा मी टू मुवमेंट सुरु झाली होती तेव्हा अनेक लोक साजीद खानविरुद्ध बोलले होते. तेव्हा मी हिंमत दाखवू शकली नाही कारण इतर कलाकारांप्रमाणे माझा कोणी गॉडफादर नाही. कुटुंबासाठी मला कमावावं लागत होतं म्हणून मी गप्प होती. आता मी माझ्या आई-वडिलांसोबत नाहिये. मी माझ्यासाठी कमवत आहे त्यामुळे मी आता हिंमत दाखवून सांगू शकते की जेव्हा मी १७ वर्षांची होते तेव्हा साजीद खानने माझं शोषण केलं होतं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Before democracy dies and there is no freedom of speech anymore I thought I should speak !

A post shared by Dimple paul (@paulaa__official) on

पाउला पुढे सांगते की, 'तो माझ्यासोबत घाणेरड्या गोष्टी बोलायचा. तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. मला त्याने त्याच्यासमोर कपडे काढायला सांगितले ज्यामुळे तो मला त्याच्या आगामी 'हाऊसफुल्ल' सिनेमात काम देणार होता. देव जाणे त्याने हे सगळं किती मुलींसोबत केलं असेल. त्यावेळी मी लहान होती मात्र आता बस्स झालं. त्याने तुरुंगात असलं पाहिजे. केवळ कास्टिंग काऊचसाठी नाही तर लोकांना फूस लावण्यासाठी देखील. मात्र आता मी थांबणार नाही. मी याबद्दल बोलली नसती तर ती चूक झाली असती.'    

model paula accused sajid khan of sexual harassment  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: model paula accused sajid khan of harassment