'सुपरस्टार' बापलेकांनी सुरु केली ऑक्सिजन बँक

यापूर्वी देखील चिरंजीवीनं कोरोना पीडीतांना मदत केली होती.
Actor chiranjeevi and ramcharan
Actor chiranjeevi and ramcharanTeam esakal

मुंबई - साऊथचा प्रसिध्द अभिनेता चिरंजीवी आणि त्याचा मुलगा रामचरण (chiranjeevi son ram charan )यांनी मिळून कोविडग्रस्तांसाठी (covid patients)मदतीचा हात पुढे केला आहे. यापूर्वी देखील चिरंजीवीनं कोरोना पीडीतांना मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव चाहत्यांनी केला होता. सध्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांचा ताण शासकीय व्यवस्थेवर होताना दिसतो आहे. चिरंजीवी आणि त्याचा मुलगा रामचरण या दोघांनी मिळून ऑक्सिजन बँक (oxygen bank) सुरु केली आहे. त्यांनी त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. (chiranjeevi son ram charan launches oxygen bank for covid 19 patients)

कोरोनाचा वाढणारा संसर्ग डोकेदुखीचा विषय ठरत आहे. त्याचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होताना दिसत आहे. बॉलीवूडमध्येही कोरोनानं शिरकाव केला आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी कोरोनाशी लढत आहे. काहींनी रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी टॉलीवूड (Tollywood) नेहमीच अग्रेसर असते हे दिसून आले आहे. आवडते अभिनेते आणि त्यांचा चाहतावर्ग याची तिथे काही कमी नाही.

सुपरस्टार चिरंजीवी आणि राम चरण (chiranjeevi and ramcharan) यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा (andhra pradesh and telangana)राज्यातील शहरांमध्ये ऑक्सिजन बँकची सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांनी या दोघांनाही धन्यवाद दिले आहेत. त्या त्य़ा शहरांमधील प्रशासकीय अधिका-यांशी संपर्क साधून त्यांनी याकामी त्यांची मदत घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही त्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ज्याप्रकारे चिरंजीवी आणि त्याचा मुलगा रामचरण यांनी लोकांना मदत केली आहे त्यावरुन त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Actor chiranjeevi and ramcharan
बदनामीच्या आरोपावरून कमाल खानला सलमाननं खेचलयं कोर्टात
Actor chiranjeevi and ramcharan
ऐश्वर्याची झेरॉक्स कॉपीच! स्नेहा उल्लालच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

चिरंजीवीनं आपल्या चिरंजीवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हि़डिओला कॅप्शन देताना त्यानं लिहिलं आहे की, मिशन सुरु झाले आहे. आता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कुणाचाही मृत्यु होणार नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे आम्ही ऑक्सिजन बँकेची सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com