बदनामीच्या आरोपावरून कमाल खानला सलमाननं खेचलयं कोर्टात

दुसरीकडे सलमानच्या (salman khan) लिगल टीमनं असे सांगितले आहे की,
Salman Khan news
Salman Khan newsTeam esakal

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान असणा-या सलमानचा (Salman Khan ) राधे (Radhe your most wanted bhai) रिलीज झाला. आणि त्याच्या चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. काहींनी या चित्रपटाला पसंती दिली. दुसरीकडे अनेकांनी त्याला नावंही ठेवली. सध्या प्रसिध्द अभिनेता कमाल खाननं सलमानच्या राधेवर एक रिव्ह्यु केला होता. तो सलमानच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यानं कमाल खानच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मात्र यावेळी कमाल खानच्या (kamal khan) वकिलांनी सलमाननं दाखल केलेला दावा हा त्याच्यावर बदनामीच्या आरोपावरुन केल्याचे म्हटले आहे. (Salman Khan sued Kamaal R Khan over defamatory allegations not Radhe review, says actor's lawyer)

दुसरीकडे सलमानच्या (salman khan) लिगल टीमनं असे सांगितले आहे की, कमाल आर खाननं सलमानच्या त्या चित्रपटाविषयक बदनामी केली आहे. त्या चित्रपटावर टीका केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. सलमानलाही कमाल खानच्या या प्रकारानं वाईट वाटलं आहे. कमाल खानची ही काही आताची सवय नाही यापूर्वी देखील त्यानं सलमानच्या बिइंग ह्युमनवर (Being Human) टीका केली आहे. त्यामुळे त्याच्यावर बदनामी केल्याच्या प्रकरणावरुन कोर्टात दावा दाखल करण्यात आला आहे.

कमाल आर खाननं व्टिट करुन सलमानचा (Salman khan) राग शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो माझ्या नेमक्या कुठल्या गोष्टीचं सलमानला वाईट वाटले हे त्यानं सांगाव. मी त्याच्या चित्रपटाचा रिव्ह्यु एक गंमत म्हणून केला होता. त्यानं तो गांभीर्यानं घेतला असावा असे मला वाटते. मी यापुढे त्याच्या चित्रपटाचे रिव्ह्यु करु नयेत असे जर त्यानं सांगितले तर मी ते करणार नाही. असेही कमालनं म्हटलं आहे.

Salman Khan news
'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ
Salman Khan news
'तारक मेहता..'चे नट्टू काका नेटकऱ्यांवर चिडले; म्हणाले..

कमाल खानच्या वतीनं त्याच्या वकिलानं म्हटलं आहे की, सलमानने कमाल खानवर त्याची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. सलमान आणि त्याचा ब्रँण्ड बिइंग ह्युमन हा काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला आहे. मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफरही त्यामाध्यमातून झाल्याचे कमालच्या वकिलांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com