Chitra wagh vs Urfi Javed : उर्फीच्या वादात चित्रा वाघ अन् रूपाली चाकणकर आमनेसामने

उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला
Chitra wagh vs Urfi Javed
Chitra wagh vs Urfi JavedEsakal

उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहचला असून दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यानंतर आता हा वाद राज्याच्या महिला आयोगापर्यंत पोहोचला असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

याबाबत चित्रा वाघ यांनी ट्विटर वरून एक व्हिडिओ ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीर प्रदर्शनाचे जे अतिशय बिभत्स आहे. राज्य महिला आयोग समर्थन करत आहे का?, असा सवाल वाघ यांनी विचारला आहे.

चित्रा वाघ यांच्या या प्रश्नावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना म्हंटलं आहे की, राज्य महिला आयोगाकडे आत्तापर्यंत 10 हजार 907 तक्रारी आल्या. त्यापैकी 9 हजार 520 तक्रारी आम्ही निकाली काढल्या आहेत. त्यामुळं राज्य महिला आयोग व्यापक स्वरूपात काम करत आहे. तेंव्हा आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही. असं प्रत्युत्तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच नाव न घेता दिले.

Chitra wagh vs Urfi Javed
Deepika Padukone Birthday: लग्नानंतरही बिनधास्तपणे बोल्ड आणि इंटीमेट सीन देते दीपिका पदूकोण, कारण..

कोणी काय कपडे परिधान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही, असं देखील चाकणकर म्हणाल्या आहेत. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातून ही कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेंव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असं देखील चाकणकर म्हणाल्या आहेत.

Chitra wagh vs Urfi Javed
Shahrukh Khan: 'आता रिटायरमेंट घे..',. नेटकऱ्यानं डिवचल्यावर गरजला 'पठाण'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com