Chitra Wagh : उर्फीचा काही खरं नाही, 'बोलणं बस्सं आता फक्त...' वाघ पुन्हा गरजल्या!

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी जावेद यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले आहे.
Chitra Wagh tweet
Chitra Wagh tweet esakal
Updated on

Chitra Wagh Comment On Urfi Javed tv entertainment celebrity : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी जावेद यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले आहे. काल तर उर्फीनं त्यांच्यावर टोकाची टीका करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिनं चित्रा वाघ यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता.

उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी उर्फीला यापुढे भान ठेवून वागण्याचा सल्ला दिला होता. महाराष्ट्रात राहायचे तर कपड्यांची मर्यादा पाळायला हवी. तसं झालं नाही तर कानशीलात लगावण्याची भाषाही चित्रा वाघ यांनी केली होती. दुसरीकडे भाजपच्या महिला संघटनांनी उर्फीच्या घराबाहेर निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. त्यात उर्फीच्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

उर्फीनं काल चित्रा वाघ यांना संजय राठोड आठवतात का, आता तर ते तुमचे मित्र झाले आहेत अशा शब्दांत निशाणा साधला होता. त्यानंतर चित्रू असा उल्लेख करत आपण चांगल्या मैत्रीणी होऊ शकतो. असेही म्हटले होते. यावर आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपली भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उर्फीला इशारा दिला आहे.

Chitra Wagh tweet
Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

चित्रा वाघ यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. असे म्हणताना त्यांनी राज्य महिला आयोगाला ही पोस्ट टॅग केली आहे. आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

Chitra Wagh tweet
Urfi Javed Tweet : 'चित्रू' म्हणत उर्फीनं पुन्हा काढली कळ! 'आपण आता...'

सोशल मीडियावर चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद वाढताना दिसतो आहे. त्यात उर्फी देखील सातत्यानं चित्रा वाघ यांच्याविरोधात टोकाच्या प्रतिक्रिया देते आहे. तिनं तर आता चित्रा वाघ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना चित्रू असेही म्हटले आहे. नेटकऱ्यांनी तर उर्फीनं चित्रा वाघ यांना जशास तसे उत्तर दिले असे म्हणताना उर्फीनं वाघ यांची कुंडलीच बाहेर काढल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com