चित्रकर्मी पुरस्कारांचे 24 जुलैला वितरण

टीम ई सकाळ
सोमवार, 17 जुलै 2017

अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण 24 जुलैला करण्यात येणार आहे. विशेष बाब अशी की यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनाही गौरवण्यात येणार आहे. 

पुणे: अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या चित्रकर्मी पुरस्कारांचे वितरण 24 जुलैला करण्यात येणार आहे. विशेष बाब अशी की यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांनाही गौरवण्यात येणार आहे. 

मराठी सिनेसृष्टीसाठी बहुमोल योगदान दिलेल्या मान्यवरांनाा या पुरस्काराने गौरवले जाते. मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी चित्रकर्मी पुरस्कार दिला जातो. यंदा तो 24 जुलैला देण्यात येणार असून चित्रपटसृष्टीतील 18 मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येईल. शिवाय या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवलेल्या मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये व्हेंटिलेटर,  सायकल आदी चित्रपटातील मान्यवरांचा समावेश होतो. 

हा कार्यक्रम पुण्यात बालगंधर्व नाट्यगृहात होणार आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. 

Web Title: Chitrakarmi awards esakal news