‘सावळी असल्यामुळे काम मिळणं अवघड होतं’

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

सध्या मॉडेल आणि अभिनेत्री चित्रगंदाला नेटक-यांनी सतावलं आहे. याचे कारण म्हणजे तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात तिने आपल्याला बॉलीवूडमध्ये सुरुवातीला आपल्या दिसण्यामुळे काम मिळणं अवघड झाल्याचे म्हटले आहे.

मुंबई - बॉलीवूडमध्ये एखाद्याला त्याच्या दिसण्यावरुन काम नाकारलं अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर त्या कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव टाकला आहे. अशी काही उदाहरणे आहेत. रंग, रुप, व्यंग यामुळे सुरुवातीला संघर्षाची वाट चालाव्या लागणा-या कलाकारांनी स्वताचे वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

सध्या मॉडेल आणि अभिनेत्री चित्रगंदाला नेटक-यांनी सतावलं आहे. याचे कारण म्हणजे तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात तिने आपल्याला बॉलीवूडमध्ये सुरुवातीला आपल्या दिसण्यामुळे काम मिळणं अवघड झाल्याचे म्हटले आहे.

स्‍टुअर्ट डग्लस यांच्या ‘Shuggie Bain’ला यंदाचं 'Booker Prize'

वास्तविक बॉलीवूडमध्ये वर्णसंघर्षाचा वाद याअगोदरही पेटला होता. तसेच नेपोटिझमवर सतत कोणी टिप्पणी करत असते. प्रसिध्द अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने आपला एक अनुभव शेअर केला होता. आता त्यानंतर चित्रांगदाने वर्णभेदावर आपली बाजू मांडली. आपल्याला सावळ्या रंगामुळे संधी नाकारण्यात आली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @chitrangda

अशा परिस्थितीत आपल्याला गीतकार गुलजार यांनी मदत केल्याचे तिने सांगितले. सुदैवाने मी जी ऑडिशन दिली होती, ती ऑडिशन गुलजार साहेबांनी पाहिली आणि काही दिवसांनी त्यांच्या गाण्यात मला काम करण्याची संधी मिळाली. सिनेसृष्टीतील प्रत्येक व्यक्ती त्वचेच्या रंगाकडे पाहून काम देत नाही हे मला त्या दिवशी लक्षात आल्याचे  चित्रांगदाने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले. ती म्हणाली, ‘सावळ्या रंगामुळे माझ्याकडून मॉडेलिंगचे काम काढून घेण्यात आले होते. 

अमृता फडणवीस यांचे ' तिला जगु द्या' व्हायरल, 42 हजार डिसलाईक

नवाझुद्दीन सिद्दीकीने  बॉलीवूडमध्ये सावळ्या रंगामुळे अडचणींचा सामना करावा लागल्याचे भाष्य केले होते. यामुळे त्याच्यावरुन मोठ्या चर्चेला सुरुवात झाली होती. सावळा रंग आणि चांगला दिसत नसल्यामुळे मला सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळाली नव्हती, असे त्याने म्हटले होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chitranganda Sigh face many issue releted her color at the time working in bollywood