अमृता फडणवीस यांचे ' तिला जगु द्या' व्हायरल, 42 हजार डिसलाईक

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

टी सीरिजच्या वतीने हे गाणं भाऊबीजच्या दिवशी रिलिज करण्यात आले आहे. या गाण्यातून महिला सक्षमीकरण विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. महत्वाच्या सामाजिक विषयाला प्राधान्य देण्यात आले असताना देखील प्रेक्षकांनी त्यावर टीका केल्याचे दिसून आले आहे.

मुंबई -  राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या आवाजातील एक गाणे नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यापूर्वीही अमृता यांनी काही सेलिब्रेटींबरोबर गाणे गायले आहे. यात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. सध्या त्य़ांच्या या नव्या गाण्याची सगळीकडे चर्चा आहे. त्यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं जात आहे.

अमृता या सोशल मीडीयावर सतत वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. सध्या त्यांचे  ' तिला जगु द्या' अशा नावाचे गाणे  यांच्या आवाजात प्रसिध्द झाले आहे. त्याला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. आतापर्यत या व्हिडीओला सहा हजार लाईक्स आणि तब्बल 42 हजार डिस्लाईक मिळाले आहेत. 14 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

यावर अनेकांनी अमृता यांच्या गाण्यावर कमेंट केली आहे. लाईक्सच्या तुलनेत त्या गाण्याला नापसंती दर्शविणा-यांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे नेटक-य़ांच्या गंमतीशीर प्रतिक्रियांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतल्या आहेत.अमृता फडणवीस या गायक आहेत. तसेच त्यांचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सध्या त्यांच्या नव्या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर त्याविषयी सांगितलं आहे.

‘ KBC मध्ये 1 कोटी जिंकले, मॅगी पाकिटात 2 मसाला पाऊच मिळाले'

टी सीरिजच्या वतीने हे गाणं भाऊबीजच्या दिवशी रिलिज करण्यात आले आहे. या गाण्यातून महिला सक्षमीकरण विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. महत्वाच्या सामाजिक विषयाला प्राधान्य देण्यात आले असताना देखील प्रेक्षकांनी त्यावर टीका केल्याचे दिसून आले आहे. प्रसिध्द करण्यात आले आहे. सध्या गाण्याचे मराठी व्हर्जन रिलिज झाले आहे. 

'ज्योतिबाचा चुकीचा इतिहास दाखवला जाणार नाही',मालिकेच्या वादावर तोडगा

यापूर्वी अमृता फडणवीस या चर्चेत आल्या होत्या. लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्य़ात त्या एका मिटींगमध्ये असल्याचे दिसून आले. त्यावेळी जवळच्या एका टेबलवर असणा-या कागदावर फोटो घेत राहा. असे लिहिले होते. त्यामुळेही त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New song of Amruta Fadnavis Tila Jagu Dya viral on social media